हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी झटणारे अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या सुरक्षेसाठी केंद्रातील शासन बांगलादेश शासनावर दबाव आणणार का ?
ढाका : बांगलादेशमधील चितगाव जिल्ह्यातील हाथझरी येथे सुमनकुमार डे या व्यावसायिकाचा पोलिसांनी खंडणीसाठी छळ चालवला होता. या छळाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या बांगलादेश मायनॉरीटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना हाथझरी येथील पोलीस उपअधीक्षक मोशिउद्दौला रझा यांनी दूरध्वनीवरून या प्रकरणाची चौकशी केल्यास महाग पडेल, अशी धमकी दिली, असे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी कळवले आहे. (भारतात अल्पसंख्यांकांच्या कोटकल्याणासाठी चढाओढीने प्रयत्न करणारे कधी बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंसाठी आवाज उठवतील का ? भारतात अल्पसंख्यांकांच्या रक्षणासाठी तथाकथित पुरोगामी आवाज उठवतात; मात्र बांगलादेशमध्ये कोणीही पुरोगामी नसल्याने अल्पसंख्यांक हिंदूंना वार्यावर सोडले जाते, एखादी तस्लीमा नसरीन यासाठी प्रयत्न करते, तेव्हा तिला देशातून पळवून लावले जाते ! – संपादक)
१. सुपर स्टोन आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुमनकुमार डे यांचा १४ सप्टेंबर २०१५ या दिवशी हाथझरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी खंडणी मागून शारीरिक छळ केला होता.
२. श्री. डे यांनी त्याविरुद्ध ढाका येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
३. त्यामुळे दुखावलेल्या पोलिसांनी श्री. डे यांना त्रास देणे चालूच ठेवले.
४. त्यानंतर श्री. डे यांनी बांगलादेश मायनॉरीटी वॉच या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्याशी संपर्क केला.
५. श्री. घोष या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी २७ जानेवारी या दिवशी हाथझरी येथे पोचले. त्यांनी बांगलादेशच्या गृहमंत्र्यांशी आणि उच्च पोलीस अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.
६. हाथझरी येथील पोलिसांना हे कळताच पोलीस उपअधीक्षक मोशिउद्दौला रझा यांनी घोष यांना दूरध्वनीवरून धमकी दिली. यावरून बांगलादेशमधील पोलीस उच्च न्यायालयाला किती महत्त्व देतात हे दिसून आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात