Menu Close

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : हिंदुत्वनिष्ठांकडून भारतभर सभा, बैठका, व्याख्याने यांद्वारे समाजप्रबोधन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम

उंबरगाव, गुजरात येथे आयोजित सभेत धर्माभिमानी हिंदूंकडून हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य अव्याहतपणे करण्याची सामूहिक प्रतिज्ञा !

व्यासपिठावर डावीकडून श्री. निखिल दर्जी, श्री. सुनील तिवारी, श्री. नमुभाई पटेल, श्री. जयेश गोर आणि श्री. वैभव आफळे

गुजरातमध्ये हिंदु राष्ट्र जागृती अभियानाला आरंभ

उंबरगाव (गुजरात) : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र जागृती सभेचे येथील गांधी सदन सभागृहात आयोजन करण्यात आले. सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य यापुढे अव्याहतपणे करत रहाण्यासाठी उपस्थित धर्माभिमान्यानी सामूहिक प्रतिज्ञा केली. या सभेत प्रखर धर्मप्रेमी श्री. जयेश गोर, संजाण येथील ‘धर्मजागृती समिती’ आणि ‘श्री जय अंबे नवयुवक मित्र मंडळ’ यांचे श्री. नमुभाई पटेल, श्री. सुनील तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. वैभव आफळे हे उपस्थित होते. या सभेचा संजाण, उंबरगाव आणि दमण परिसरातील १०० हून अधिक धर्माभिमान्यांनी लाभ घेतला.

समितीचे गुजरात समन्वयक श्री. संतोष आळशी यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीमध्ये साधनेचे महत्त्व आणि प्रत्यक्ष साधना यांविषयी मार्गदर्शन केले. सभेचा आरंभ शंखनाद आणि दीपप्रज्वलनाने झाला. सभेचे सूत्रसंचालन धर्माभिमानी सौ. उज्ज्वला पंचाल यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. निखिल दर्जी यांनी समितीचे कार्य आणि आगामी कार्याची दिशा यांविषयी उपस्थित धर्माभिन्यांना माहिती दिली.

गणेशोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी समितीला समवेत घेऊन कार्य करणार ! – श्री. सुनील तिवारी, धर्माभिमानी

आमच्या संघटनेच्या वतीने विविध उपक्रम आयोजित केले जातात. येणार्‍या गणेशोत्सव काळात अपप्रकार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनाही समवेत घेऊन कार्य करू.

याप्रसंगी त्यांनी संजाण आणि उंबरगाव परिसरात हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराच्या समस्येविषयी उपस्थितांना माहिती दिली.

उत्स्फूर्त सहभाग

सभेच्या सिद्धतेसाठी धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सभेचा प्रसार आणि सभेची सिद्धता करण्यासाठी उंबरगाव येथील धर्मशिक्षण वर्गात येणार्‍या धर्माभिमानी युवकांनी उस्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये धर्माभिमानी श्री. हरगोविंद पंचाल, सौ. उज्ज्वला पंचाल, श्री. अमृतभाई पंचाल, श्री.मनोज पटेल, श्री. आकाश आहलपारा यांनी सभा यशस्वी होण्यासाठी प्रसार केला आणि प्रत्यक्ष सभेच्या दिवशी विशेष प्रयत्न केले. सभेनिमित्त केलेल्या सेवेमुळे त्यांना खूप आनंद मिळाला.

वेचक वेधक !

परात्पर गुरु डॉ.आठवले यांच्यासारख्या महान विभूती हिंदूंना मार्गदर्शन करत असल्याविषयी प्रखर धर्मप्रेमी श्री. जयेश गोर यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त !

श्री. वैभव आफळे यांनी हिंदु राष्ट्रासाठी अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एकमेवाद्वितीय कार्याची ओळख करून दिल्यावर उपस्थित सर्वांनाच प्रेरणा मिळाली.

सभेला उपस्थित रहाण्यासाठी उंबरगाव आणि संजाण येथील युवक, तसेच दमणसारख्या दूरच्या ठिकाणाहूनही युवक आले होते.

पेट्रोलपंप अभियानाला प्रतिसाद

पेट्रोलपंपांवर ग्राहकांच्या हितांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने आवश्यक सूत्रे तसेच त्याच्याशी संबंधित फलक लावण्याविषयी भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयाला निवेदन देण्यासाठी सभास्थळी स्वाक्षरी अभियान राबवले गेले. त्यालासुद्धा धर्मप्रेमीनी चांगला प्रतिसाद दिला.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन

प्रखर धर्मप्रेमी श्री. जयेश गोर यांनी त्यांचे विचार व्यक्त करतांना ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात प्रत्येक हिंदूने सहभागी व्हावे, तसचे जिथे जिथे धर्महानी होत असेल, तिथे तिथे वैध मार्गाने त्याचा निषेध नोंदवून धर्मकार्यात सहभागी व्हावे’, असे आवाहन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *