कोल्हापूर : हिंदूंवरील समस्यांच्या निराकरणासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविना पर्याय नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. शिवजयंतीच्या निमित्ताने उंचगाव येथील श्री मंगेश्वर मंदिराजवळ २९ एप्रिलच्या रात्री ८ वाजता संयुक्त शिवजयंती उत्सव, उंचगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर समितीचे सर्वश्री मधुकर नाझरे, जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. महेश चौगुले उपस्थित होते. या कार्यक्रमाला ५०० जिज्ञासूंची उपस्थिती होती. कार्यक्रमात सर्पमित्र आणि विजेचा धक्का लागून एका महिलेला जळतांना वाचवणारे सर्पमित्र आणि श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री संदीप साळुंखे, सर्पमित्र लक्ष्मण कुल्लूर आणि सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाईंगडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री शरद माळी, विजय करी, सतीश मुसळे, दीपक रेडेकर, अमित पाटील, विजय गुळवे, सागर गुळवे आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले की,
१. श्री विठ्ठल मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिर येथील अर्पण पैसे अन् दागिने यांत मोठ्या प्रमाणात अपहार केला जात आहे. या अपहाराच्या विरोधात हिंदू कधी संघटित आणि जागृत होणार आहेत ?
२. हिंदूंनी मंदिरात दिलेला पैसा अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी वापरला जातोे. ख्रिस्ती आणि मशिदीमधून हिंदूंसाठी पैसा दिला जात नाही, मग हिंदूंच्या मंदिरांतील पैसा ख्रिस्ती आणि मुसलमानांसाठी का द्यायचा ?
३. हिंदूंनी संघटित होऊन पोलिसांना मशिदींवर लावण्यात येणार्या भोंग्याविषयी विचारणा केली असती, तर आज मशिदींवर एकही भोंगा दिसला नसता.
४. मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण वर्गात सहभागी व्हावे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात