दापोली : भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी देहधारी रहाणे आवश्यक असल्याने त्यांचा महामृत्यूयोग टळावा, त्यांचे स्वास्थ्य उत्तम रहावे, समस्त भारतीय जनतेमध्ये सनातन हिंदु धर्माच्या नैतिक मूल्यांचे आचरण करण्यासाठी प्रवृत्ती निर्माण व्हावी, यासाठी येथील २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी स्वयंस्फूर्तीने मुरुड गावाचे ग्रामदैवत श्री देव भैरवनाथ मंदिरात श्रीफळ ठेवले, तसेच श्री देव भैरवनाथांच्या चरणी साकडे (गार्हाणे) घातले.
या वेळी गावचे पाटील श्री. जनार्दन हरिश्चंद्र बटावले, भैरीकोंडवाडीचे अध्यक्ष श्री. शरद बाळकृष्ण जाधव, तांबडीचा कोंडचे अध्यक्ष श्री. शशिकांत तुपे, बोवनेवाडीचे अध्यक्ष श्री. सदानंद रामचंद्र साटले, शीपवाडीचे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल पांडुरंग सावंत, मंदिराचे पुजारी श्री. अनंत गंगाराम गुरव, हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणीच्या अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, सनातन संस्थेचे श्री. अमित खेराडे यांसह भैरीकोंड, तांबडीचा कोंड, बोवनेवाडी आणि शीपवाडी येथील धर्माभिमानी उपस्थित होते. मंदिराचे पुरोहित श्री. अनंत गंगाराम गुरव यांनी देवाला गार्हाणे घातले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात