तासगाव (जिल्हा सांगली) : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ सांगितला. ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्याने मार्च २०१७ पर्यंत ७१ साधक संतपदी विराजमान झाले असून १ सहस्र १४ हून अधिक साधक संतत्वाकडे वाटचाल करत आहेत. एखाद्या आध्यात्मिक संस्थेतील एवढ्या मोठ्या प्रमाणात साधकांनी आध्यात्मिक प्रगती करणे, ही कलियुगातील एकमेवाद्वितीय घटना आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या कु. सविता खेराडकर यांनी केले. त्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे एकमेवाद्वितीय कार्य’, या विषयावर येळावी (जिल्हा सांगली) येथे नृसिंह देवस्थान येथे बोलत होत्या.
नागाव (जिल्हा सांगली) येथेही मार्गदर्शन
नागाव (जिल्हा सांगली) : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या विचारांतून प्रेरणा घेऊन वर्ष २००२ मध्ये हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ राज्यांत ५०० हून अधिक विनामूल्य धर्मशिक्षणवर्ग, दूरचित्रवाहिन्यांसाठीचे ‘धर्मसत्संग’, बालसंस्कारवर्ग, प्रबोधनपत्रके आदींद्वारे हिंदु धर्माचा प्रसार चालू आहे. समितीने १३ राज्यांत आयोजित केलेल्या १ सहस्र २५० हून अधिक हिंदु धर्मजागृती सभांतून १६ लक्षांहून अधिक हिंदूंमध्ये जागृती झाली असून ३ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सक्रीय झाले आहेत, असे मार्गदर्शन कु. सविता खेराडकर यांनी केले. त्या नागाव येथे हिंदु धर्माभिमानी श्री. कोळेकर यांच्या घरी झालेल्या मार्गदर्शनात बोलत होत्या. याचा लाभ १५ हिंदु धर्माभिमान्यांनी घेतला. दोन्ही ठिकाणी ‘साधना आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांची आवश्यकता’ या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात