Menu Close

बलात्कार पीडितेला ‘कपडे काढून बलात्कार कुठे झाला ते दाखव’, असे म्हणणारे हरियाणा पोलीस !

रोहतक (हरियाणा) : हरियाणामधील १४ वर्षाच्या बलात्कार पीडितेने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून पोलिसांवर आरोप केला आहे की, त्यांनी चौकशीच्या नावाखाली तिला कपडे काढण्यासाठी दबाव आणला. पोलिसांचे म्हणणे होते की, पीडितीने कपडे काढल्यावर बलात्कार झाला आहे कि नाही, हे ते पडताळणार. तसेच एका पोलिसाने तिच्या जांघांना स्पर्श केला, तर अन्य एकाने पाय पकडले. या याचिकेद्वारे या पीडितेने पोलिसांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी केली आहे. यावर न्यायालयाने हरियाणाच्या महासंचालकांना नोटीस जारी केली आहे.

पोलीस हवालदाराने तरुणाच्या अंगावर गाडी घातली !

ठाणे : २१ एप्रिलला आर्थिक वादातून पोलीस हवालदार रमेश आवटे यांनी अतुल पेठे या तरुणाच्या अंगावर गाडी घालून त्याला काही अंतर फरफटत नेले. रस्त्यावरील नागरिकांनी आरडाओरडा केला, त्यामुळे पेठे यांचा जीव वाचला. सीसीटीव्हीत ही घटना चित्रीत झाली आहे. हवालदार आवटे मुंबई पोलिसांच्या विशेष गुन्हेगारी शाखेमध्ये कार्यरत आहेत. पाचपाखाडी येथील प्रशांत कॉर्नरच्या बाहेर ही घटना घडली. या संदर्भात गुन्हा प्रविष्ट होऊनही अद्याप आवटे यांच्यावर कारवाई झालेली नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *