भोर (जिल्हा पुणे) : आपण आपल्या मुलांना शिवचरित्र वाचायला देत नाही. परिणामी आपली पिढी पुरुषार्थहीन आणि नपुंसक जन्माला येत आहे. सध्या इतिहासाचे विकृतीकरण झाल्यामुळे ज्वलंत इतिहास न वाचता आपण बुळबुळीत इतिहास वाचत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळले असते, तर आज देशाचे चित्र वेगळेच दिसले असते. हिंदूंनी कीडा-मुंगीप्रमाणे न जगता सिंहाप्रमाणे जीवन जगायला हवे, त्यासाठीच शिवचरित्र वाचावे. हिंदुस्थानचा आत्मा हिंदुत्व असून तेच राष्ट्रीयत्व आहे, हे सर्व हिंदूंनी लक्षात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी केले. येथील जिजामाता प्राथमिक विद्यालयामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ३० एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. सभेच्या प्रारंभी पू. भिडेगुरुजींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या सभेला २ सहस्र धारकरी आणि धर्माभिमानी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, अनेक शतकांपासून हिंदु धर्मावर आक्रमणे होत आहेत; कारण हिंदूंनी प्रतिकार केला नाही. जितका हिंदू जास्त सुरक्षित, तितका तो भेकड आणि संकुचित असतो.
३ जून या दिवशी रायगडावर ३२ मणांचे सुवर्ण सिंहासन बनवण्याचा संकल्प सोहळा आयोजित केला आहे. येथील १२ मावळातील तरुणांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पू. भिडेगुरुजी यांनी केले.
दैनिक सनातन प्रभातविषयी पू. भिडेगुरुजी यांचे गौरवोद्गार !
१. पू. भिडेगुरुजींनी मार्गदर्शनात २ वेळा सनातन प्रभातविषयी गौरवोद्गार काढले.
२. कार्यक्रमानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वजीत चव्हाण यांनी पू. भिडेगुरुजी यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी स्वतःकडील दैनिक सनातन प्रभातचा अंक दाखवत सांगितले की, मी प्रतिदिन दैनिक वाचतो. आजही सकाळी दैनिक वाचूनच बाहेर पडलो आहे.
क्षणचित्रे
१. सभेपूर्वी पोलिसांनी आयोजकांना बोलावून सांगितले की, पू. गुरुजींनी मार्गदर्शनामध्ये भडक आणि वादग्रस्त वक्तव्य करू नये. (हिंदुद्वेष्टे पोलीस ! मुल्ला-मौलवी अथवा धर्मांध नेते यांना अशा प्रकारे सांगण्याचे धाडस पोलीस करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. पोलिसांनी संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण केले.
३. सनातन संस्थेच्या वतीने येथे राष्ट्र आणि धर्मविषयक ग्रंथप्रदर्शन लावले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात