Menu Close

जळगाव येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी स्थापन झालेल्या शासकीय समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीचा समावेश !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी राष्ट्रध्वजाचा मान राखा ही मोहीम राबवली जाते. या वर्षी समितीच्या वतीने जळगाव येथे जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल यांना ४ जानेवारी या दिवशी याविषयी निवेदन दिले आणि जिल्हास्तरीय समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीला सहभागी करून घेण्याची विनंती केली होती. त्या वेळी त्यांनी आम्हाला अशा स्वयंस्फूर्तीने कार्य करणार्‍यांची आवश्यकता आहे, असे सांगितले होते आणि १८ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या ३ सदस्यांना जिल्हास्तरीय समितीमध्ये आणि ६ सदस्यांना तालुका स्तरावरच्या समितीमध्ये सहभागी करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी एका आदेशाद्वारे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *