परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियान
जयसिंगपूर : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आरंभ करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत जयसिंगपूर येथे मुक्त सैनिक वसाहतीत १ मे या दिवशी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या वेळी श्री गणेश आध्यात्मिक ट्रस्टचे श्री गणेश मंदिर आणि समोरील दोन मंदिरे यांची स्वच्छता करण्यात आली. प्रथम श्री गणेशाला प्रार्थना करण्यात आली. जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् असा जयघोष करून स्वच्छतेस आरंभ करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अण्णासाहेब वरेकर यांनी मंदिर स्वच्छता अभियानाचा उद्देश, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीचे कार्य आणि वैशिष्ट्ये सांगितली. श्री गणेशाची आरती करून त्याला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले.
या वेळी श्री गणेश आध्यात्मिक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय कोळी, उपाध्यक्ष श्री. रामचंद्र गोडसे, सदस्य सर्वश्री शिवाजीराव घाटवडे, श्रीकांत जाधव, नारायण काटकर उपस्थित होते. ही स्वच्छता शाहूनगर येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. यात सर्वश्री परशुराम भोसले, बाळासाहेब भोसले, सौ. अक्काताई कुराडे, सौ. द्रौपदी शिंगाडे, सौ. लक्ष्मीबाई भोसले, सौ. सुजाता भोसले, कु. अर्पिता भोसले यांचा सहभाग होता. या वेळी सनातनचे साधक श्री. शंकर खुडे उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. साकडे घालण्याच्या वेळी हार-फुलांची व्यवस्था धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी केली होती.
२. श्री गणेश आध्यात्मिक ट्रस्टच्या वतीने सरबताची व्यवस्था करण्यात आली.
३. परिसरातील साप्ताहिक सनातन प्रभातचे वर्गणीदार श्री. मांगूरकर आणि श्री. घोरपडे उपक्रमात सहभागी झाले होते.
४. मंदिर स्वच्छतेनंतर परिसरात चैतन्य जाणवू लागल्याचे एका धर्माभिमान्याने सांगितले.
आरतीच्या वेळी श्री गणेशाने दिला कौल !
स्वच्छता अभियानाच्या वेळी सर्वांनी भावपूर्ण प्रार्थना करून श्री गणेशाची आरती केली. त्या वेळी मूर्तीच्या उजव्या खांद्यावरील फूल खाली पडले. त्यामुळे श्री गणेशाने कौल दिल्याचे पाहून सर्वांचा भाव जागृत झाला.
अभियान पूर्ण झाल्यावर ट्रस्टचे अध्यक्ष आणि सदस्य यांनी तुमचे कार्य चांगले असून आमच्याकडेही धर्मशिक्षणवर्ग चालू करा, अशी मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments