विज्ञानाने प्रगती केली कि अधोगती, हे या विधानातून लक्षात येते !
न्यूयॉर्क : येत्या १०० वर्षांत मानवाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर आसरा घ्यावा लागेल. येत्या काही वर्षांत पृथ्वी मानवी वास्तव्यायोग्य रहाणार नसल्याने माणसाला हे पाऊल उचलावेच लागेल, असे विधान ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे.
हॉकिंग यांनी मांडलेली सूत्रे
१. हवामानातील पालट, उल्कापात आणि अतिलोकसंख्या यांमुळे पृथ्वी भकास होईल. त्यामुळे मानवाला रहाण्यासाठी नवा ग्रह शोधावा लागेल.
२. आपल्या हातून वेळ निसटून जात आहे. त्यामुळे लवकर हालचाली केल्या नाहीत, तर अनर्थ ओढावू शकतो. मानवाला परग्रहावर वास्तव्य करावेच लागेल.
३. माणसाने केलेली प्रगतीच त्याच्यासाठी घातक ठरू शकते.
४. माणसाचा वाढलेला वेग, आण्विक शक्ती आणि रासायनिक आक्रमणे यांंमुळे पृथ्वीचा विनाश आणखी जवळ येईल.
५. विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस परावलंबी होत चालला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून रहाण्याची इतर प्राण्यांची कला माणसाने गमावली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात