नेरूळ (नवी मुंबई) : आता छत्रपती शिवाजी महाराजांची आरती किंवा पूजा करून भागणार नाही, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वाटचाल करणे, हीच हिंदवी स्वराज्यासाठीची साधना असून हाच महाराष्ट्र धर्म आहे. तोच सर्व मावळ्यांना जागवायचा आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले. येथील धर्माभिमान्यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संत तुकाराम ओंबळे समाज मंदिर, सेक्टर १८ येथे व्याख्यान आयोजित केले होते. त्यात श्री. सागवेकर बोलत होते.
यानंतर श्री शिवप्रतिष्ठानचे अस्मित कोंडाळकर यांनी ३२ मण सुवर्ण सिंहासनाविषयी सांगितले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भरत माळी, हिंदु महासभेचे मंगेश म्हात्रे यांसह २५ जण उपस्थित होते. सर्वांनी आठवड्यातून पुन्हा एकदा भेटण्याचे नियोजन केले. या कार्यक्रमासाठी धर्माभिमानी श्री. अक्षय काळे आणि नेरूळमधील धारकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात