१. एर्णाकुळम् येथे एका संघटनेच्यामासिक बैठकीत धर्माचरणाच्या काही सोप्या कृतींविषयी दुसर्यांदा प्रवचन !
एर्णाकुळम्मधील एडवनक्काड आणि वैप्पिन या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रत्येकी एक प्रवचन करण्यात आले. एस्.एन्.डी.पी. नामक जाती संघटनेच्या या भागातील एका युनिटच्या मासिक बैठकीत आयोजकांनी समितीच्या कार्यकर्त्यांना प्रवचनासाठी बोलावले होते. या वेळी समितीच्या कु. अदिती सुखटणकर यांनी धर्माचरणाच्या काही सोप्या कृतींच्या अंतर्गत कुंकू लावण्यामागील शास्त्र आणि योग्य पद्धत, एकमेकांना नमस्कार करण्याची पद्धत अन् त्याचे महत्त्व, तसेच वास्तुशुद्धीसाठीच्या सोप्या पद्धती, हे विषय सांगितले. या प्रवचनाचा ३५ जणांनी लाभ घेतला. याच युनिटमध्ये फेब्रुवारी २०१७ मध्येही प्रवचन झाले होते. प्रवचनानंतर एका वयस्कर व्यक्तीने कुंकू लावण्याची शास्त्रीय पद्धत समजल्याने समाधान व्यक्त केले.
२. गुढीपाडव्याच्या निमित्ताने एर्णाकुळम् जिल्ह्यात व्यापक प्रसार !
२ अ. गुढीपाडव्याचे महत्त्व आणि हिंदूंचा नववर्षदिन या विषयावरील प्रवचनाला चांगली उपस्थिती ! : गुढीपाडव्याच्या निमित्ताने एर्णाकुळम् जिल्ह्यात एकूण ३ ठिकाणी प्रवचने आयोजित केली होती. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शालिनी सुरेश यांनी २ मंदिरांमध्ये (शिवमारियम्मन् कोविल तथा श्रीगोपालकृष्ण मंदिर) येथे गुढीपाडव्याचे महत्त्व आणि हिंदूंचा नववर्षदिन याविषयी माहिती दिली. या प्रवचनांचा दोन्ही मंदिरांमध्ये २८ जणांनी लाभ घेतला.
२ आ. गुढीपाडवा आणि कुलदेवतेचे महत्त्व या विषयांवरील प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! : समितीच्या कु. प्रणिता सुखटणकर यांनी एर्णाकुळम् येथील महालक्ष्मी संकुलात गुढीपाडवा आणि कुलदेवतेचे महत्त्व या विषयांवर केलेल्या प्रवचनाचा २५ जणांनी लाभ घेतला. याच वेळी ब्रह्मध्वजाचे महत्त्व आणि तोे कसा उभारायचा ? याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. उपस्थितांना हा विषय आवडला आणि त्यांनी जिज्ञासेने अनेक प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
२ इ. ठळक वैशिष्ट्ये
१. सनातन प्रभातच्या एका वाचकाने सनातन संस्थेच्या नामसंकीर्तनयोग या लघुग्रंथाच्या प्रती प्रायोजित केल्या आणि महालक्ष्मी संकुलातील निवासींमध्ये वरील प्रवचनाच्या १ – २ दिवस आधी प्रत्येकी १ याप्रमाणे हा लघुग्रंथ वितरित केला.
२. केरळमध्ये गुढीपाडवा साजरा करत नाहीत, तरीही काक्कनाड येथील धर्मशिक्षणवर्गात येणार्या जिज्ञासूंना गुढीपाडवा हा विषय फार आवडला. त्यांनी गुढी उभारण्याची पद्धत समजूून घेतली.
– कु. प्रणिता सुखटणकर, केरळ
३. केरळ येथील एर्णाकुळम् जिल्ह्यातील एका जाती संघटनेच्या मासिक बैठकीत धर्माचरणाचे महत्त्व या विषयावर प्रवचन
१२.३.२०१७ या दिवशी एर्णाकुळम् येथील एडवनक्काड, वैप्पिन या ठिकाणी एस्.एन्.डी.पी. नावाच्या जातीय संघटनेमधील एका युनिटच्या मासिक बैठकीत आयोजकांनी समितीच्या कार्यकर्त्यांना प्रवचनासाठी निमंत्रित केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या कु. अदिती सुखटणकर यांनी कुंकू लावण्याचे शास्त्र आणि योग्य पद्धत, शास्त्रानुसार नमस्कार करण्याची पद्धत आणि त्याचे महत्त्व, वास्तूशुद्धीच्या सोप्या पद्धती इत्यादी धर्माचरणाच्या काही सोप्या कृतींविषयी सांगितले. या प्रवचनाचा ३५ जणांनी लाभ घेतला. मागील मासातही या युनिटच्या बैठकीत प्रवचन झाले होते.
कुंकू लावण्याचे महत्त्व सांगितल्यानंतर एका वयस्कर व्यक्तीने सांगितले, कुंकू कोणत्या बोटाने लावायचे, हे आज माझ्या लक्षात आले.
– कु. अदिती सुखटणकर, केरळ (१६.३.२०१७)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात