तुळजापूर येथे परशुराम जयंती उत्साहात साजरी !
तुळजापूर : परशुरामांचा आदर्श समोर ठेऊन क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज वाढवून तरुणांनी राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्याची वेळ आली आहे. धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी केले. येथे परशुराम जयंतीच्या निमित्ताने आर्य चौक येथे श्री परशुराम मूर्ती आणि बसवेश्वर श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात विविध संघटना, तसेच राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. बुणगे पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंच्या मंदिरांतील परंपरा चालू रहाण्यासाठी श्री तुळजाभवानी संरक्षण कृती समिती तुळजापूर यांच्या वतीने ११ मे या दिवशी मंदिरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.’’ या वेळी बाळासाहेब दीक्षित, सुनील पिंटु रोचकरी, विशाल रोचकरी, बंडू पाठक, समाधान परमेश्वर, नागेश नाईक आदी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात