Menu Close

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

मुंबई, कल्याण आणि पुणे येथे भव्य हिंदु ऐक्य दिंडीचे आयोजन

मुंबई : सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’चे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना १८ मे २०१७ या दिवशी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतभरामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई, कल्याण आणि पुणे येथे भव्य हिंदु ऐक्य दिंडीचे अनुक्रमे ६ आणि ७ मे या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीमध्ये शौर्य जागरण करणारे मर्दानी खेळ, राष्ट्र-धर्म यांविषयीचे उद्बोधक फलक, चित्ररथ, बालपथक आदींचा समावेश असणार आहे.

मुंबई

स्थळ (प्रारंभ) गोल देऊळ, कबूतरखान्याजवळ, दादर (पश्‍चिम) ते श्री स्वामी नारायण मंदिर, दादर (पूर्व) (सांगता)
वार आणि दिनांक – शनिवार, ६ मे २०१७
वेळ सायंकाळी ५

कल्याण

स्थळ – (प्रारंभ) साई चौक, खडकपाडा, कल्याण (पश्‍चिम) ते शंकरराव चौक (सांगता)
वार आणि दिनांक – रविवार, ७ मे २०१७
वेळ – सायंकाळी ५

पुणे

स्थळ – (प्रारंभ) डी. मार्ट मॉल, काळेवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, पिंपरीगाव (सांगता)
वार आणि दिनांक – रविवार, ७ मे २०१७
वेळ – सायंकाळी ५.३०

या फेर्‍यांमध्ये हिंदुत्वनिष्ठ, सनातनचे हितचिंतक, सनातन प्रभातचे वाचक, विज्ञापनदाते, संप्रदाय, विविध आध्यात्मिक संस्थांचे साधक आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांनी सहभागी होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञतापुष्प अर्पण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहर आणि काळेवाडी येथे आयोजिलेल्या ‘भव्य हिंदू एकता दिंडी’मध्ये सहभागी व्हा ! – श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून सर्वश्री विजय गावडे, विद्याधर नारगोलकर, पराग गोखले आणि शंभू गवारे

पुणे : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात हिंदु राष्ट्राविषयी जागर होण्यासाठी सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक क्षेत्रांत कार्यरत विविध संघटनांनी एकत्रितपणे ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ आरंभले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी येथील काळेवाडी आणि पुणे शहर येथे अनुक्रमे ७ आणि १४ मे या दिवशी ‘भव्य हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यांमध्ये अधिकाधिक हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ५ मे या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे, पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर आणि गार्गी फाऊंडेशनचे श्री. विजय गावडे उपस्थित होते.

बर्‍हाणपूर (तालुका बारामती) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि श्री जोगेश्‍वरीदेवी यांना साकडे !

श्री भैरवनाथ आणि श्री जोगेश्‍वरीदेवी यांना प्रार्थना करतांना हिंदु धर्माभिमानी

बर्‍हाणपूर (तालुका बारामती) : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आरंभ करण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि श्री जोगेश्‍वरीदेवी यांना साकडे घालण्यात आले. ३ मे या दिवशी ग्रामदेवतेच्या यात्रेचे औचित्य साधून हे साकडे घालण्यात आले.

१. पहाटेपासूनच दोन्ही देवतांची षोडशोपचारे पूजा, अभिषेक आणि विधीवत होम करण्यात आला. नंतर नारळ आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले.

२. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश जाधव यांनी सध्याच्या भीषण आपत्काळाची उपस्थितांना जाणीव करून दिली. शेजारील उंचवडी गावात नुकताच वादळी पाऊस झाल्याने तेथील अनेक लोकांच्या घराचे पत्रे उडून गेले होते. ‘अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सर्वांचे आध्यात्मिक सामर्थ्य वाढवायला हवे’, असे या वेळी सर्वांना सांगण्यात आले.

३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संकल्पाला देवतांचा आशीर्वाद मिळावा आणि हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम रहावे’, यासाठी देवतांना साकडे घालण्यात आले.

४. श्री. मानसिंग गवळी आणि सौ. छाया गवळी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

५. या वेळी सनातन संस्थेचे श्री. दयानंद खरात, पुरोहित श्री. संजय गोसावी, धर्माभिमानी सर्वश्री निवृत्ती गवळी, महादेव साळुंखे, सचिन दरेकर, श्रीमती रुक्मिणी जाधव यांच्यासह ३५ जण उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी आल्या. या माध्यमातून साक्षात वरुणदेवाने आशीर्वाद दिल्याचे ग्रामस्थांना जाणवले.

२. ग्रामदेवतेच्या यात्रेच्या निमित्ताने रात्री ११ वाजता निघालेली मिरवणूक पहाटे ५ वाजता संपली, असे प्रथमच झाले. प्रतीवर्षी ही मिरवणूक रात्री २ वाजेपर्यंत संपते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *