Menu Close

खारघर (नवी मुंबई) येथे क्रांतीकारकांवरील फलकांच्या प्रदर्शनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई येथे फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यान

अभियानांतर्गत क्रांतीकारकांच्या फलकांचे प्रदर्शन

नवी मुंबई : खारघर येथील ओम साई ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, सुदर्शन नाईक, शैलेश पटेल, नीलेश कदम यांसह अन्य पदाधिकार्‍यांनी प्रदर्शनासाठी परिश्रम घेतले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. २५० हून अधिक धर्माभिमान्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.

हिंदू असंघटित असल्यानेच हिंदूंची विदारक स्थिती ! – सुमित सागवेकर

नवी मुंबई : हिंदू असंघटित असल्यानेच हिंदूंची विदारक स्थिती झाली आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी येथे केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत करावे गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित व्याख्यानात बोलत होते. या वेळी त्यांनी मंदिर सरकारीकरण, लव्ह जिहाद यांसह अन्य समस्याही मांडल्या.

ते पुढे म्हणाले, ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. यामध्ये अनेकदा हिंदूंचा बुद्धीभेद करून, तर कधी प्रलोभने दाखवूनही धर्मांतर केले जात आहे. दुसरीकडे हिंदूच हिंदु धर्माचे वैरी झाले आहेत; कारण आपलेच काही लोक धार्मिक रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात तक्रार करतात. पोलीसही जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांना लक्ष्य करत आहेत; मात्र भेंडीबाजारात उरूसाच्या वेळी रात्रभर चालू असलेला डीजे बंद करण्याचे वा न्यायालयाने आदेश देऊनही मशिदींवरील भोंगे काढण्याचे धाडस पोलीस करत नाहीत. का तर म्हणे तेथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. या सर्वांवर एकच उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र ! ही काळाची आवश्यकता आहे. या वेळी ४० धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. मुंबईत व्याख्याने आणि प्रवचने यांच्यासाठी जिज्ञासूंकडून मागणी येत असून प्रवचनांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *