Menu Close

मुंबईत ठिकठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून रुजवले हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचारांचे रोपटे !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याची उपस्थितांची सिद्धता

पवई येथील श्री दुर्गाप्रिय गणेश मंदिरात व्याख्यान

श्री दुर्गाप्रिय गणेश मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी मार्गदर्शन केले. ३५ भाविकांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. व्याख्यान ऐकल्यावर मंदिराचे अध्यक्ष श्री. विलास यांनी हिंदु जनजागृती समिती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य पुष्कळ आवडले, असे सांगितले.

विक्रोळी येथील मारुति मंदिरात प्रत्येक शनिवारी व्याख्यान घेण्यास अनुमती

सुप्रसिद्ध हनुमान मंदिरात स्थानिक भाविकांकडून प्रत्येक शनिवारी कीर्तन, हनुमान चालिसा पठण आणि हनुमंताची आरती केली जाते. या वेळी सौ. नयना भगत यांनी हिंदु धर्माची सद्यस्थिती आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन ऐकून कीर्तनकार प्रभावित होऊन म्हणाले, हे मार्गदर्शन ऐकल्यानंतर मला खेदाने सांगावेसे वाटते की, आज खरोखर हिंदु समाज मृतवत झाला आहे. मृतवत समाजाला अशाच प्रभावी विचारांची खर्‍या अर्थाने आवश्यकता आहे. मंदिरातील उपस्थित ५० भाविकांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.

क्षणचित्र

मंदिराच्या व्यवस्थापनाने प्रत्येक मासाच्या पहिल्या शनिवारी उपस्थित भाविकांसाठी व्याख्यान ठेवण्याची अनुमती दिली, तसेच मंदिराबाहेर लावण्यात आलेले सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन मंदिराच्या आत लावण्यास सांगितले.

घाटकोपर येथील शिकवणीवर्गातील शिक्षकांसाठी व्याख्यानाचे आयोजन

येथील गुरुकृपा शिकवणीवर्गातील दहावीतील विद्यार्थ्यांना समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील तरुण पिढीचे योगदान या विषयावर सौ. नयना भगत यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानातील विषय आवडल्याचे शिक्षकांनी स्वत:हून सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *