Menu Close

गोवा येथे होणार्‍या सहाव्या ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या सिद्धतेला आरंभ !

फोंडा (गोवा) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ ते १७ जून २०१७ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथ देवस्थान, रामनाथी, गोवा येथे ‘सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. तसेच १९ ते २१ जून या कालावधीत ‘हिंदु राष्ट्र कार्यकर्ता निर्मिती अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.

या अधिवेशनांमध्ये भारतातील २५ राज्ये तसेच नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका इत्यादी राष्ट्रांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.

अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मदान करण्याची विनंती !

अधिवेशनासाठी सभागृह, निवास, भोजन, प्रदर्शन, स्थानिक वाहतूक इत्यादी कारणांसाठी अनुमाने ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. धर्मप्रेमी दानशूरांनी या कार्यासाठी सढळ हस्ते अर्थसाहाय्य करावे. या धर्मदानावर ‘आयकर कायदा, १९६१’ नुसार ‘८०जी(५)’ खाली आयकरात सूट मिळू शकते. अर्पणदाते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. धनादेश हिंदु जनजागृती समितीच्या नावे स्वीकारले जातील.

धर्मदानासाठी विवरण

बँकेचे नाव : Bank of Maharashtra

शाखेचे नाव : शिवशाही, सोलापूर बचत खाते

क्रमांक : ६०१६७६८२०१०

बचत खात्याचे नाव : हिंदु जनजागृती समिती

आयएफ्एससी क्रमांक : MAHB0000668

विशेष सूचना : धर्मदान म्हणून बँकेत निधी जमा केल्यानंतर त्यासंबंधीची तपशीलवार माहिती [email protected] या ई-मेल पत्त्यावर पाठवावी किंवा श्री. सुरजित माथुर यांना (०८३२) २३१२६६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

समितीच्या कार्यकर्त्यांना आणि सनातनच्या साधकांना सूचना

आतापर्यंतच्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांचा संक्षिप्त माहिती सांगणारा दृकश्राव्य दृश्यपट (audio-visual) उपलब्ध !

या पूर्वी समितीच्या वतीने पाच अधिवेशने यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती. या अधिवेशनांविषयी सर्व हिंदूंना माहिती मिळावी, यासाठी अधिवेशनांतील महत्त्वाची क्षणचित्रे दर्शवणारा ४.३० मिनिटांचा हिंदी भाषेतील दृश्यपट (व्हिडिओ) निर्माण करण्यात आला आहे. या दृश्यपटातून हिंदु धर्माभिमान्यांमध्ये, तसेच सामान्य जनतेमध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयी नवचेतना जागृत होणार आहे. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक या दृश्यपटाचा उपयोग अधिवेशनासाठी धर्मदान गोळा करणे किंवा अन्य तत्सम साहाय्य मिळवणे यांसाठी करू शकतात.

या माहितीपटाची लिंक : goo.gl/FCLccl

(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.) हा व्हिडिओ डाऊनलोड करण्यात काही अडचण असल्यास सौ. गायत्री शास्त्री किंवा कु. धनश्री टोंगे यांच्याशी पुढील संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

संगणकीय पत्ता : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *