पहाटे ध्वनीवर्धकावरून होणारी अजान आणि मुसलमानांच्या धार्मिक उत्सवांमध्ये होणारे ध्वनीप्रदूषण यांवरून मुसलमानांना अशी अटक करण्याचे धाडस पोलिसांत आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोल्हापूर : गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण करणा-या विविध गणेशोत्सव मंडळांच्या ४८ कार्यकर्त्यांना ध्वनीमर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषणाच्या निर्णयाविषयी दिलेल्या निर्णयानुसार ही अटक करण्यात आली आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत त्यांना कळंबा कारागृहात रहावे लागणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बीवर बंदी असतांना शिरोली परिसरात काही गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचे उल्लंघन करून डॉल्बी लावून धिंगाणा घातला. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने गणेशोत्सवात डॉल्बी लावून धिंगाणा घातला जातो. सनातन आणि हिंदु जनजागृती समिती हिंदूंच्या उत्सवांत शिरलेल्या गैरप्रकारांच्या विरोधात चळवळ राबवतांना हिंदूंना धर्मशिक्षण देते. उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी मंडळांनी राष्ट्र आणि धर्म यांवरील कार्यक्रम ठेवावेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात