Menu Close

उत्तर प्रदेशमध्ये हिंदुंचे धर्मांतर करणाऱ्या आणि गोमांस खायला लावणाऱ्या व्यक्तीची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काढली गाढवावरून धिंड !

हिंदु धर्मावर सातत्याने आघात करणाऱ्यांच्या विरोधात शासन कारवाई करत नसल्यामुळेच हिंदूंना अशा प्रकारे संताप करावा लागत आहे ! –  संपादक, दैनिक सनातन प्रभात

उरई (उत्तरप्रदेश) : तीन हिंदु तरुणांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्याच्या तसेच गोमांस खायला घालण्याच्या आरोपावरून अवधेश नामक एका व्यक्तीची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाढवावरून धिंड काढली. कार्यकर्त्यांनी अवधेशचे डोके, भुवया यांवरील केस आणि मिशी कापली तसेच त्याला चपलांचा हार घातला. यानंतर त्याला गाढवावर बसवून संपूर्ण शहरात फिरवण्यात आले. हे प्रकरण उरईच्या रेढर येथील आहे.

रेढर येथे रहाणाऱ्या संगम नामक मुलाला या व्यक्तीने फसवले. सत्संगाच्या निमित्ताने त्याला मिर्जापूर येथील कछवाह गावात घेऊन जाऊन त्याला ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यासह आणखी दोन तरुणांनाही अशा पद्धतीने फसवण्यात आले आहे, असे संगम याने सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *