श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित सातारा येथील सभा
सातारा : ३२९ वर्षे होऊन गेली, तरी हिंदवी स्वराज्याचे सिंहासन पुन्हा झाले नाही. राष्ट्र म्हणून अस्तित्वासाठी भूदल, नौदल, वायूदल जसे आवश्यक आहे, त्याही पेक्षा आवश्यक असे ३२ मणांचे सुवर्ण सिंहासन आहे. या सुवर्ण सिंहासनात राष्ट्राचा इतिहास सामावला आहे, असे उद्गार पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी काढले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित सातारा येथील ५ मे या दिवशी झालेल्या सभेत ते बोलत होते. रायगडावर होणार्या ३२ मण सुवर्ण सिंहासनाच्या संकल्पाच्या संदर्भात सभा पार पडली. सातारा जिल्ह्यातील धारकर्यां च्या मार्गदर्शनासाठी, तसेच सुवर्ण सिंहासनाची आवश्यकता, त्याचा इतिहास, सुवर्ण सिंहासन संकल्प यांसंदर्भात येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे सभेचे आयोजन केले होते. सभेला सातारा जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील धारकरी उपस्थित होते. पू. भिडेगुरुजी यांनी २ घंटे धारकऱ्यांना मार्गदर्शन केले.
ते पुढे म्हणाले…
१. ज्या परिस्थितीत सिंहासन केले, तेव्हा पूर्ण देश धर्मांध इस्लामी सत्तांच्या नियंत्रणात होता. कोणीही यावे आणि टपली मारून जावे, अशी हिंदूंची अवस्था होती. हत्या, बलात्कार, धर्मांतर, मंदिरे पाडणे, देवतांच्या मूर्तींची तोडफोड, गायींच्या हत्या अशा प्रकारे विध्वंस चालू होता.
२. शिवछत्रपतींनी पाच पातशाह्यांच्या नरड्यावर पाय ठेवून हिंदवी स्वराज्याचे सिंहासन निर्माण केले. शिवछत्रपती सतत मृत्यूच्या जिभेवर जगले. मोगलांनी ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचे तुकडे करून ते पळवून नेेले. सिंहासनाच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातून धारकरी उभा राहील. ३२ मण म्हणजे आजचे १ सहस्र २८० किलो सोने !
३. महाराष्ट्रात ३८ जिल्हे आणि ३९४ तालुके आहेत. हिंदु पंचांगानुसार ‘एक तिथी एक तालुका’ या प्रमाणे किमान ५०० पेक्षा जास्त तरुण सिंहासनाच्या रक्षणासाठी २४ घंटे खडा पहारा देण्यासाठी रायगडावर जाणार आहे. त्यामुळे रायगडाला वैभव प्राप्त होणार आहे. कुठल्याही राजकीय लोकांना विशेष नोंद घेऊन बोलावले जाणार नाही.
४. शतके पालटतील; पण सिंहासनाच्या रक्षणाचे कार्य अखंड चालू राहील. कुठलाही पक्ष, पंथ, संप्रदाय बाजूला ठेवून केवळ हिंदु समाजासाठी आपण रायगडावर एकत्रित संकल्पासाठी आले पाहिजे.
देश रक्तबंबाळ असल्याचे दैनिक सनातन प्रभातमुळे कळते !
जे कोणी दैनिक सनातन प्रभात वाचत असतील, त्यांना समजेल की, आजही हा देश तितकाच रक्तबंबाळ झालेला आहे. विध्वंसक धर्मांधांची आक्रमणे चालूच आहेत.
सिंहासनाच्या संकल्पासाठी ५ लाख धारकरी महाराष्ट्रातून रायगडावर येणार !
३ जून या दिवशी दुपारी ४ वाजता रायगडावर उपस्थित रहावे. संध्याकाळी ५ वाजता संकल्प कार्यक्रम चालू होईल. तो दुसर्याड दिवशी म्हणजेच ४ जूनला सकाळी १० पर्यंत संपेल. सिंहासनाच्या संकल्पासाठी ५ लाख धारकरी उभ्या महाराष्ट्रातून रायगडावर येतील. किमान १ लाख धारकरी हे छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा येथून येतील.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात