हिंदुत्वनिष्ठांना संघटित करून त्यांना दिशादर्शन करणारी व्याख्याने !
निपाणी : येथील कोगनोळी भागात २५ एप्रिल या दिवशी संयुक्त प्रभाग क्रमांक ३ च्या वतीने तरुणांसाठी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमात स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. विश्वजीत गायकवाड यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी ‘सध्या हिंदूंची स्थिती आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी मंडळाचे कार्यकर्ते सर्वश्री अमित गायकवाड, रामदास जगदाळे, अमोल गायकवाड, स्वप्नील कोळी, रोहन कोळी, प्रमोद इंगवले, सागर कोळी, योगेश पवार, उदय लोहार यांसह ६५ तरुण उपस्थित होते.
क्षणचित्र : कार्यक्रमानंतर १ घंटा २५ हून अधिक तरुण चर्चेसाठी थांबले होते. चर्चेमध्ये गावात सभा घेण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले.
महागाव (जिल्हा कोल्हापूर) येथेव्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचा पुढाकार
महागाव : सध्या कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे. अलीकडेच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज परिसरातील महागाव येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर येथे ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी व्याख्यान दिले. त्याला गावातील ५० जिज्ञासूंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात स्थानिक प्रतिष्ठित नागरिक श्री. अरुण देशपांडे यांनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे निवृत्त प्राध्यापक सर्वश्री दत्तात्रय किनकर, मंदिराचे पुजारी श्री. जयवंत पाठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अमित राव आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. संजय बासनहट्टी कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी श्री. दुसे यांनी ‘हिंदु राष्ट्र का आवश्यक आहे’, हे उपस्थितांना अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात