सांगली : गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयांत विनामूल्य उपचार मिळावेत, या उद्देशाने शासनाकडून सवलत घेणार्या धर्मादाय रुग्णालयांना नियमाप्रमाणे ठराविक प्रमाणात दारिद्य्ररेषेखालील रुग्णांना निःशुल्क वा सवलतीच्या दरात उपचार देणे, खाटा उपलब्ध करणे आदी गोष्टी बंधनकारक आहेत, असे असतांना याचे पालन न करणार्या धर्मादाय रुग्णालयांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीसह अन्य समविचारी संघटनांनी लढा देण्यास प्रारंभ केला आहे. या अंतर्गत ५ मे या दिवशी लोकनेते राजारामबापू पाटील हॉस्पिटल रिसर्च सेंटर, ईश्वरपूर या रुग्णालयाने दर्शनी भागात हे सूचना फलक लावलेले नाहीत. अशा मागणीचे निवेदन साहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. राजेश परदेशी यांना देण्यात आले.
या वेळी माजी आमदार आणि शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन समितीचे निमंत्रक श्री. नितीन शिंदे, शिवसेनेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. धर्मेंद्र (आबा) कोळी, शिवसेनेचे मिरज येथील श्री. महेशसिंग रजपूत, हिंदु धर्माभिमानी श्री. महादेव अनुरे, हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे, सर्वश्री संतोष देसाई, दत्तात्रय रेठरेकर उपस्थित होते.
विशेष
१. स्थानिक ‘बालाजी केबल न्यूज’ यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांची मुलाखत घेतली.
२. श्री. नितीन शिंदे यांनी हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या आंदोलनाचे कौतुक करून अशा प्रकारच्या आंदोलनाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात