परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम
शिवगोरक्ष मठामधील (सिंहगड रस्ता) प्रवचनानंतर जिज्ञासूंचा कार्यामध्ये कृतीशील होण्याचा मानस
शिवगोरक्ष मठात दोन वेळा व्याख्यान घेण्यात आले. शिवगोरक्ष मठाचे व्यवस्थापन पहाणारे श्री. सचिन नवलेकर यांनी मठामध्ये घेण्यात आलेल्या दोन्ही प्रवचनांच्या वेळी बसण्याची सोय उपलब्ध करून दिली.
उत्स्फूर्त अभिप्राय
१. ‘मला उद्यापासूनच तुमच्या संस्थेत सेवा करायची आहे’, असे सांगणार्या सौ. मंगल खंडागळे !
शिवगोरक्ष मठात प्रवचन झाल्यावर सौ. मंगल खंडागळे यांनी उत्स्फूर्तपणे, ‘मला उद्यापासूनच तुमच्या संस्थेत सेवा करायची आहे. कशी करू ? मी नांदेड सिटी परिसरात प्रवचन ठरवते’, असे सांगितले.
२. ‘मी प्रतिदिन २ घंटे सेवा करू शकते’, असे सांगणार्या सौ. विनिता माने !
‘आमचा योगासनाचा वर्ग असून तुमच्या उपक्रमांचे पत्रक द्या. ते योगासनाच्या वर्गात सांगून काय काय करू शकतो, ते पहाते’, असे सौ. विनिता माने यांनी सांगितले. ‘‘मी प्रतिदिन २ घंटे सेवा करू शकते’’, असेही त्या म्हणाल्या.
३. ‘सनातनच्या आश्रमात अनेक उच्चशिक्षित साधक साधना करतात, हे वैशिष्ट्यपूर्ण !’, असे सांगणारे श्री. अजय नायडू !
श्री. अजय नायडू यांनी हिंदुत्वाविषयी सूत्रांवर चर्चा केली. ते म्हणाले, ‘सनातनच्या आश्रमात अनेक उच्चशिक्षित साधक बाकीच्या गोष्टी सोडून साधना करतात, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.’
४. काही जिज्ञासूंनी ‘व्हॉट्स अॅप’वरील मजकूर नियमितपणे नातेवाईक आणि मित्र यांना पाठवत जाऊ’, असे सांगितले.
५. ‘हिंदू एकता दिंडीमध्ये काही जणांना घेऊन सहभागी होऊ’, असे सांगणार्या आजी !
हिंदू एकता दिंडीचा विषय सांगितल्यावर एका आजींनी ‘मी दिंडीमध्ये कुटुंबियांना घेऊन सहभागी होते आणि शेजार्यांनाही सांगते’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.
वडगाव बुद्रुक येथे साप्ताहिक सनातन प्रभातच्या वाचकांकडून प्रवचनाचे आयोजन !
वडगाव बुद्रुक येथील श्री स्वामी समर्थ मठात समितीचे श्री. गजानन मुंज यांनी व्याख्यान घेतले. कात्रज येथील साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. गोविंद कानशुक्ले गुरुजी यांनी पुढाकार घेऊन प्रवचन आयोजित केले होते.
उत्स्फूर्त सहभाग
प्रत्येक मासाला एक प्रवचन घेण्याचा सवाईमळा, थुगाव येथील ग्रामस्थांचा निर्धार !
मंचर येथील सवाईमळा, थुगाव (सातगाव पठार) या ठिकाणी २५ महिला आणि पुरुष यांच्या उपस्थितीत हिंदु जनजागृती समितीच्या कु. मोनिका गावडे यांनी ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’ याविषयी प्रवचन घेतले. त्या वेळी ग्रामस्थांनी प्रत्येक मासाला एक प्रवचन घेण्याविषयी ठरवले.
धर्माभिमान्यांना नामजपातील आनंद मिळाल्याने त्यांनी सेवेला येण्याची सिद्धता दर्शवणे
चिंचवड येथील धर्माभिमानी श्री. ठाकूर प्रभुसिंग किसनसिंग तांडुरवाले यांना आम्ही प्रथमच भेटायला गेलो. त्यांना कुलदेवतेच्या नामाचे महत्त्व सांगितले आणि सेवेविषयीही माहिती दिली. त्यांनी त्याच दिवसापासून नामजप करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी मला भ्रमणभाषवर संपर्क करून सांगितले, ‘‘नामजपामुळे पुष्कळ आनंद मिळत आहे. मला सेवेला यायचे आहे. माझी गाडी घेऊन सेवेला जाऊया.’’ – श्री. अशोक कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड, पुणे
सनातनचे ग्रंथ मौल्यवान असून भेट देण्यासाठी त्यासारखे दुसरे काही नाही ! – श्री. संभूस, वास्तूशास्त्र अभ्यासक, तळेगाव
सनातनचे कार्य चांगले आहे. तुम्ही सर्वजण साधक पुष्कळ करता; पण मीही सनातनचे कार्य समाजात पोचवण्यास न्यून पडतो. मी माझ्याकडे येणार्यांना काही ना काही भेट देतो. सनातनचे ग्रंथ एवढे मौल्यवान आहेत की, मी ते आजपासून भेट म्हणून देत जाईन. त्यासारखे दुसरे मौल्यवान काही नाही. तुम्ही मला तुमचे ग्रंथ द्या.
पुणे – भक्ती आणि शक्ती यांचा अपूर्व संगम असलेले पुणे ! छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या शौर्याचा साक्षी पुणे जिल्ह्यात ठायीठायी पहायला मिळतात. त्यासह अनेक थोर संतांची परंपरा पुण्याला लाभली आहे. या सर्वांचा पुण्याला लाभलेला हा समृद्ध वारसा जोपासण्याचे कार्य परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राबवण्यात येणार्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाद्वारे केले जात आहे. जिल्ह्यात राबवण्यात येणार्या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे बर्याच ठिकाणी घेण्यात आलेल्या व्याख्यानानंतर उपस्थित जिज्ञासू उत्स्फूर्तपणे सत्सेवा करण्यास उद्युक्त होत आहेत. यावरून, ‘हे अभियान दैवी असून साधक आणि हिंदू यांच्यातील चैतन्यजागृतीचे माध्यम आहे’, असेच म्हणावे लागेल ! पुण्यातील नर्हेगाव, सिंहगड रस्ता, कात्रज, कर्वेनगर, चिंचवड, भोर आणि मंचर येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या अन् विविध विषयांवर प्रवचने घेण्यात आली. त्याविषयीचे अनुभव येथे देत आहे.
पिंपरी-चिंचवड येथे सनातन प्रभातच्या वाचकांकडे सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे वितरण करतांना मिळालेला प्रतिसाद
पुणे – पिंपरी-चिंचवड आणि परिसरामध्ये अभियानांतर्गत सनातन प्रभातच्या वाचकांनाही संपर्क करण्यात येत आहेत. त्यामध्ये वाचकांना सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांची माहिती सांगितल्यावर त्यांनी दिलेले उत्स्फूर्त अभिप्राय येथे देत आहोत.
१. ‘मला ग्रंथ दान करायला पुष्कळ आवडते. सनातनचे ग्रंथ चांगले आहेत. सर्व लोकांपर्यंत हे ग्रंथ पोहोचले पाहिजेत.’ – श्री. बाळासाहेब ढेरे, दैनिक सनातन प्रभातचे वाचक
२. ‘मला ग्रंथ वाचनाची आवड आहे. सनातनचे ग्रंथ समाजात अभ्यासासाठी द्यायला मला पुष्कळ आवडेल.’ – श्रीमती सुनंदा बाळासाहेब खुटवड (शिक्षिका), साप्ताहिक सनातन प्रभातच्या वाचक
३. ‘सनातनचे अनमोल ग्रंथ वाचण्यासाठी मला वेळ उपलब्ध होत नाही; पण हे ग्रंथ समाजात जाऊ दे. त्यामुळे माझ्याकडून धर्मकार्यात थोडा सहभाग होईल.’ – श्री. राजेश अरवंदेकर, श्री स्वामी समर्थ यांचे भक्त
प्रवचन आयोजित करण्यासाठी जिज्ञासू महिलांचा पुढाकार !
जुन्नर येथील परदेशपुरा भागामध्ये सौ. अनिता परदेशी आणि सौ. कल्पना परदेशी यांनी प्रवचनाची सिद्धता केली, तसेच महिलांना एकत्र करण्यासाठी प्रसारही केला. येथील महिलांनी ‘प्रत्येक १५ दिवसांनंतर सत्संग घेण्यात यावा’, अशी मागणी केली.
मंचर येथे प्रत्येक मासाला एक प्रवचन घेण्याची मागणी !
डोबीमळा, मंचर येथे धर्माभिमानी श्री. शशिकांत बाणखेले यांच्या घरी प्रवचन घेण्यात आले. या व्याख्यानाला २३ जण उपस्थित होते. त्याचा प्रसार सौ. वैशाली बाणखेले यांनी स्वतः केला. प्रवचनानंतर प्रत्येक मासाला एक प्रवचन घेण्याची मागणी केली.
घरोघरी जाऊन प्रसार करणार्या धर्माभिमानी सौ. वर्हाडीआजी !
एकलहरे, मंचर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनाला ३० जिज्ञासू उपस्थित होते. येथील धर्माभिमानी सौ. वर्हाडीआजी यांनी किमान ३ वेळा घरोघरी जाऊन प्रवचनाचा प्रसार केला. येथेही प्रत्येक मासाला एक प्रवचन घेण्याची मागणी करण्यात आली.
पू. उदयनाथ महाराज यांच्याकडून समितीच्या कार्याचे कौतुक !
सिंहगड रस्ता परिसरातील आंबेगाव येथील शिवगोरक्ष मठात व्याख्यान झाले. त्यानंतर पू. उदयनाथ महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक करतांना, ‘प्रवचन चांगले आहे. तुम्ही जे करत आहात, ते चांगले आहे’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात