सांगली : हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात सांगलीवाडी, ईश्वरपूर, तुंग येथे घेण्यात आलेल्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगलीवाडी येथे नवक्रांती क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
१. २ मे या दिवशी कु. प्रतिभा तावरे यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ हा विषय मांडला. या व्याख्यानासाठी ३६ पुरुष आणि २१ महिला उपस्थित होत्या. व्याख्यानानंतर अनेकांनी धर्मकार्यासाठी वेळ देण्याची इच्छा व्यक्त केली.
२. ईश्वरपूर येथे नृसिंहमंदिरात ३ मे या दिवशी कु. प्रतिभा तावरे ‘हिंदु धर्म-राष्ट्र यांची सद्यस्थिती आणि त्यांवर होणारे आघात’ यांवर, तर हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत चव्हाण यांनी ‘शौर्यजागरण’ या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानाच्या अगोदर पावसाचे वातावरण असूनही जिज्ञासू शेवटपर्यंत थांबले होते.
३. तुंग येथे श्री विठ्ठल मंदिर येथे सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या एकमेवाद्वितीय कार्याची माहिती दिली. या वेळी त्यांनी हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत भ्रष्टाचार आणि अनियमितता यांच्या विरोधात कशा प्रकारे लढा चालू आहे, याचीही माहिती दिली. याचा लाभ ३८ जिज्ञासूंनी घेतला. येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
हिंदु राष्ट्र जागृती अभियानात कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो ?
- हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी
- ‘हिंदु राष्ट्र जागृती सभां’चे आयोजन करणे
- ‘हिंदु शौर्य जागरण शिबिरां’चे आयोजन करणे
हे उपक्रम आयोजित करण्यासाठी संपर्क : श्री. सुनील घनवट – ९४०४९ ५६५३४
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात