गवळीवाडी-खंडेराजुरी : येथे हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. सभेची सर्वच सिद्धता गावातील हिंदु धर्माभिमान्यांनी पुढाकार घेऊन केली होती. सभेसाठी ७० पुरुष आणि २५ महिला उपस्थित होत्या.
सभेतील हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांचे विचार !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ अध्यात्मातील उच्च शिक्षण आणि आध्यात्मिक संशोधन यांसाठी कार्यरत असेल ! – कु. प्रतिभा तावरे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेच्या सर्वांगांना स्पर्श करणार्या वैज्ञानिक भाषेतील ग्रंथसंपदेची निर्मिती केली आहे. अध्यात्मशास्त्र, देवतांची उपासना, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, ईश्वरप्राप्तीसाठी कला, संमोहन उपचार इत्यादी विविध विषयांवर मार्च २०१७ पर्यंत सनातन-निर्मित २९९ ग्रंथांच्या १५ भाषांमध्ये ६८ लाख ३९ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. अजूनही ८ सहस्र ग्रंथ प्रकाशित होऊ शकतील, इतके ज्ञान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे संग्रही आहे. तक्षशिला, नालंदा आदी प्राचीन विद्यापिठांसम असलेले ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन होत आहे. हे विश्वविद्यालय अध्यात्मातील उच्च शिक्षण आणि आध्यात्मिक संशोधन यांसाठी कार्यरत असेल.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होणे, ही काळानुसार साधना ! – प्रशांत चव्हाण
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भक्तीयोग, कर्मयोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग या साधनामार्गांचा संगम असलेल्या आणि शीघ्र गतीने आध्यात्मिक प्रगती करून देणारा ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग विकसित केला आहे. हिंदु राष्ट्र्राच्या स्थापनेच्या कार्यात सहभागी होणे, ही काळानुसार साधनाच आहे. हिंदूसंघटनाच्या दृष्टीने प्रयत्न करणे, हाही समष्टी साधनेचा महत्त्वाचा भाग आहे.’’
क्षणचित्रे
१. येथे धर्मशिक्षण फलक लावण्यात आले होते.
२. सभेच्या ठिकाणी वेगळेच चैतन्य जाणवत होते.
सांगली येथील आदर्श गाव असलेल्या गवळीवाडी-खंडेराजुरी येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीला साकडे !
हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत ४ मे या दिवशी गवळीवाडीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मीदेवी हिची भावपूर्ण ओटी भरण्यात आली. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले. या वेळी सर्वश्री युवराज गवळी, अरविंद गवळी, अनिल गवळी, नितीश गवळी, अमोल गवळी, विक्रम गवळी, केदार गवळी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मनोज गवळी, गिरीष पुजारी, सनातन संस्थेच्या कु. सुरेखा आचार्य आणि सौ. स्नेहा पुजारी सहभागी झाल्या होत्या.
आदर्श असणारे गाव गवळीवाडी !
या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात एकही अहिंदू नाही. गावातील एकही तंटा पोलीस ठाण्यात जात नाही. गावातील लोक आपापसात बसून तंटे सोडवतात. गावात वारकर्यांची संख्या लक्षणीय आहे. गावातून प्रतिवर्षी पंढरपूर येथे दिंडी काढण्यात येते. प्रत्येक वर्षी गावात ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात येते.
हिंदु राष्ट्र जागृती अभियानात कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो ?
विविध संप्रदायांचे अनुयायी स्वतःच्या संप्रदायाच्या कार्यक्रमात ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत राबवले जाणारे उपक्रम आयोजित करणे, तसेच सांप्रदायिक ऐक्यासाठी ‘हिंदु ऐक्य दिंडी’चे आयोजन करणे
(हे उपक्रम आयोजित करण्यासाठी संपर्क : श्री. अभय वर्तक – ७७७५८ ५८३८७)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात