Menu Close

लोकप्रतिनिधींना हप्ते मिळत असल्यानेच पशूवधगृहे उघडपणे चालू ! – प्रमोद मुतालिक

श्री. प्रमोद मुतालिक

बेळगाव – गोमांस निर्यात करण्यात भारत देश जगात अग्रेसर आहे. स्वातंत्र्यानंतर देशभरात केवळ ३०० पशूवधगृहे होती. आता त्यांची संख्या ४० सहस्रांवर पोहोचली आहे. पशूवधगृहांकडून नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य, आमदार, खासदार यांना प्रतिमास हप्ते दिले जातात. त्यामुळेच पशूवधगृहे उघडपणे चालू आहेत, असा खळबळजनक आरोप श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी १० मे या दिवशी येथील पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेत श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री. रमाकांत कोंडुसकर, ग्रामीण अध्यक्ष श्री. रवि कोकितकर, श्री. बाळू पवार आदी उपस्थित होते.

श्री. प्रमोद मुतालिक पुढे म्हणाले की,

१. बेळगाव येथे काही पशूवधगृहांत तर बांगलादेशी घुसखोर काम करतात. त्यामुळे अनधिकृत पशूवधगृहे त्वरित बंद करावीत.

२. देशभरात ३२ अत्याधुनिक पशूवधगृहे उभारण्यात आली असून गोहत्येला केंद्र आणि राज्य सरकारेच उत्तरदायी आहेत.

३. भाग्यनगर (हैद्राबाद) येथील अल कबीर या पशूवधगृहात प्रतिदिन १० सहस्र गायींची हत्या केली जाते. १२ वर्षांपूर्वी या पशूवधगृहाच्या विरोधात पेजावर मठाधिशांच्या नेतृत्वाखाली मी सहभाग घेतला होता. नियम धाब्यावर बसवून वासरांचीही हत्या करण्यात येत आहे.

४. श्री. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गोरक्षा, गोहत्या, गोरक्षक आदींची चर्चा चालू आहे. या चर्चेत डावे आणि काँग्रेसचे नेते आघाडीवर आहेत. प्रामाणिकपणे गोरक्षणाचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांवर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. गोरक्षकांवर आरोप करणार्‍यांसमवेत चर्चा करण्यास मी सिद्ध आहे.

५. गायींची कत्तल करून गायींच्या सर्व अवयवांची विक्री केल्यानंतर १० सहस्र रुपये मिळतात; मात्र एका गायीपासून प्रतीवर्षी २ लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळते, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. दूध, दही, लोणी, तूप यांसमवेतच शेण आणि गोमूत्रही उपयोगी आहे. असे असतांना सर्व नियम धाब्यावर बसवून गोहत्या केली जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *