सोमवारपेठ, कर्नाटक येथील हिंदु धर्मजागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोमवारपेठ (जिल्हा कोडगु, कर्नाटक) : हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे जो सर्वांना सुखी ठेवण्याची शिकवण देतो आणि तरीही ख्रिस्ती आणि मुसलमान हिंदु धर्मावर टीका करतात. मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यासाठी जगात अनेक देश आहेत; मात्र हिंदूंसाठी केवळ भारतच आहे. देशाच्या रक्षणासाठी आपण कठोर पावले उचलायला हवी. आपल्या सैन्यदलावर आक्रमण करणार्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे, असे मत श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे बोलतांना व्यक्त केले. कर्नाटकच्या कोडगु जिल्ह्यातील सोमवारपेठ शहरात नुकतीच हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या वेळी ते बोलत होते. या सभेला स्थानिक हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अभिमन्यू कुमार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा आणि सनातन संस्थेच्या सौ. सिंधु नवीन यांनी मार्गदर्शन केले. या धर्मजागृती सभेला ३०० धर्माभिमानी उपस्थित होते. यामध्ये आमदार आपाचु रंजन यांचाही समावेश होता.
मी हिंदु आहे, असे प्रत्येक हिंदु जेव्हा अभिमानाने सांगेल, तेव्हाच हिंदु राष्ट्र येईल ! – अधिवक्ता अभिमन्यू कुमार
आज हिंदु देशाची वाताहात झाली आहे. मी हिंदु आहे, असे प्रत्येक हिंदु जेव्हा अभिमानाने सांगेल, तेव्हाच खर्या अर्थाने हिंदु राष्ट्र येईल.
धर्माचरण करणारी महिला सुरक्षित असेल ! – कु. भव्या गौडा
आज महिलांमध्ये धर्माचरणाचा अभाव दिसून येतो. या जगामध्ये समाधानी आणि सुरक्षित रहाण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक आहे.
जो धर्माचे रक्षण करील, त्याचे रक्षण ईश्वर करील ! – सौ. सिंधु नवीन
मंदिर सरकारीकरण, गोहत्या, लव्ह जिहाद, हिंदु संघटनांच्या कार्यक्रमांना अडथळे इत्यादी समस्यांना हिंदूंना सध्या सामोरे जावे लागत आहे; मात्र हिंदूंनी डगमगून न जाता हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हावे.
हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे प्रत्येक हिंदूचे ध्येय हवे ! – मोहन गौडा
धर्मांध भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी टपलेले आहेत, तर ख्रिस्ती भारताचे ख्रिस्तीकरण करू पहात आहेत; परंतु हिंदूंमध्ये मात्र जात, संप्रदाय यांवरून फूट पडलेली आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक हिंदु व्यक्तीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध होणे आवश्यक आहे.
क्षणचित्र
सोमवारपेठचे माजी आमदार वेदाप्पण, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष सौ. लोकेश्वरी गोपाल आणि पत्रकार धर्मजागृती सभेला शेवटपर्यंत उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात