बर्मिंगहम : १४ महिन्याच्या मुलासह सिरियाला जाणारी ब्रिटीश महिला आयएसआयएसमध्ये सहभागी असल्याची दोषी ठरली आहे. सोमवारी तिला शिक्षा सुनावली जाणार आहे. बर्मिंगहम येथील २६ वर्षीय तरीना दहशतवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या सीरियाला गेली होती. मात्र तिने हे आरोप फेटाळले आहेत.
पतीला खोटे बोलून कशी पोहोचली सिरियात
तरीना ऑक्टोबर २०१४ मध्ये सिरियासाठी निघाली होती. मात्र तिने पतीला सांगितले होते, की ती तुर्कीत ‘बीच हॉलिडे’साठी जात आहे. वास्तविक ती दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी इस्लामिक स्टेटची राजधानी रक्काला गेली होती. पोलिस तपासात तिच्या मोबाइल फोनमधून अनेक संशयास्पद फोटो आढळून आले. डिलिट करण्यात आलेले फोटो रिकव्हर करण्यात यश आले आहे. एका फोटोत ती बुरखा घालून हातात एके-४७ रायफलसह होती. तिचा पती शकीलचे म्हणणे आहे, की लग्नानंतर ती मानसिदृष्ट्या त्रस्त होती. दरम्यान, आयएसआयएस रिक्रुटर्सच्या ती संपर्कात आली आणि सिरियाला निघून गेली.
‘जिहादी ब्राइड’ होण्यास तरीनाने दिला नकार
तरीना रक्कामध्ये दोन महिने वेगवेगळ्या देशातून आलेल्या तरुणींसोबत एकाच घरात राहिली. येथे आयएसआयएसचे दहशतवादी येत आणि त्यांना पसंत असलेल्या मुलीला घेऊन जात.
– जिहादी ब्राइड होण्यास नकार दिल्यानंतर तरीनाने तेथून पळ काढला.
– गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ब्रिटनमधील हिथ्रो विमानतळावर दहशतवाद विरोधी पथकाने गुप्तचर संस्था एमआय-५ च्या मदतीने तिला अटक केली होती.
– तपासात समोर आले की सिरियात जाण्याआधी २०१४ मध्ये तिने ट्विटरवर आयएसआयएसला प्रमोट देखिल केले होते.
– सोशल मीडियावर तिने अनेक फोटो पोस्ट करतानाच लिहिले होते, की तिला शहीद व्हायचे आहे.
संदर्भ : दिव्य मराठी