एर्नाकुलम् (केरळ) : पालकांनी त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच तथाकथित सर्वधर्मसमभाव न शिकवता, हिंदु धर्म श्रेष्ठ कसा आहे, हे शिकवले पाहिजे. मुलांमध्ये राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जीवनात येणार्या कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी आत्मबळाची आवश्यकता असते आणि त्यासाठी साधनाच केली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. रश्मी परमेश्वरन् यांनी केले.
एर्नाकुलम् जिल्ह्यातील काक्कनाड येथे नायर सर्विस सोसायटीच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात पालक आणि मुले यांच्या समस्या आणि लव्ह जिहादच्या विळख्यातून हिंदु मुलींना कसे वाचवायचे, या विषयांवर मार्गदर्शन करतांना कु. परमेश्वरन् बोलत होत्या. या मार्गदर्शनाचा ८० हून अधिक जणांनी लाभ घेतला.
या वेळी कु. परमेश्वरन् यांनी मुलांनी पालकांना प्रतिसाद न देणे, दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाषसंच (मोबाईल) यांचा अधिक वापर करणे, महाविद्यालयीन मुलांनी अंमली पदार्थांच्या आहारी जाणे, तसेच लव्ह जिहादच्या जाळ्यात फसून हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होणे आदी समस्यांवर समयोचित मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमानंतर अनेकांनी हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत लव्ह जिहाद हा ग्रंथ विकत घेतला.
२. आयोजकांनी समितीचे असे कार्यक्रम यापुढेही आयाजित करूया, असे सांगितले.
३. या ठिकाणी आध्यात्मिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
४. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण फलकांचा लाभही जिज्ञासूंना झाला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात