Menu Close

पॅरिसपेक्षाही भयंकर हल्ले करु ! : इसिस

मुलांचे केसही पांढरे होतील

लंडन : मुसलमानांविरुद्ध युद्ध छेडण्याची जबर किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. ब्रिटनवर पॅरिसपेक्षाही महाभयंकर हल्ले करू. हे हल्ले इतके खतरनाक असतील की तुमच्या मुलांबाळांचे केससुद्धा पांढरेफटक पडतील, असा थरकाप उडवणारा इशारा इसिसने आज ब्रिटनला दिला.

अत्यंत क्रूर पद्धतीने निष्पापांचे बळी घेणार्‍या इसिसला नेस्तनाबूत करण्याचा विडा ब्रिटनने उचलला आहे. गेल्या महिन्यात ब्रिटिश संसदेने इसिसला जशास तसा जवाब देण्याचा निर्धार करत सीरियावर हवाई हल्ले करण्याचा ठराव मंजूर केला. त्यामुळे इसिसच्या दहशतवाद्यांचे पित्त खवळले आहे. इसिसच्या ‘अल नबा’ (द न्यूज) या दैनिकातील एका लेखातून हा इशारा देण्यात आला आहे,

ब्रिटनने मुस्लिमांविरोधात युद्ध छेडले आहे. त्याची जबर किंमत आता ब्रिटनला भोगावीच लागेल. असा इशारा त्यांनी दिला आहे. आम्ही ब्रिटनवर असे महाभयंकर हल्ले करू की, त्यांच्या मुलाबाळांचे केसही पांढरे होतील.

इसिसची ब्रिटनला धमकी

पॅरिसमध्ये आम्ही १३० जणांना ठार केले; पण ब्रिटनवर असा हल्ला करू की तो त्यांच्या कयामतीचा (विनाशाचा) दिवस असेल.

– काही दिवसांपूर्वी अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झालेला ब्रिटनमधील मुस्लीम दहशतवादी जिहादी जॉन याने मरण्यापूर्वी काढलेले ‘हत्याकांडात खंड पडू देऊ नका’ हे शब्द आजही आमच्या कानात घुमत आहेत. ब्रिटनवर हल्ले करून आम्ही त्याचे शब्द खरे करून दाखवू.

– आमचे हल्ले ब्रिटनचा विनाश करतील, त्यांची अशी कत्तल करू की, ब्रिटनमध्ये रक्तामांसाचे सडे पडतील. आणि आम्ही हे लवकरच करून दाखवू, अशी धमकीही देण्यात आली आहे.

संदर्भ : सामना

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *