परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’
अंबाजोगाई (जिल्हा बीड) : येथील श्री क्षेत्र अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरीदेवीच्या चरणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी १० मे या दिवशी हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे घालण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री बालाजी भारजकर, किरण जोशी, विजयानंद पाटील, पांडुरंग भारजकर, अमोल जिरे, गणेश हेडे, गोविंद भारजकर, बालाजी सुरवसे, संदीप पंडित, नवनाथ अडवणे, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये, समितीचे सोलापूर समन्वयक श्री. राजन बुणगे आणि श्री. मंगेश बोरस्कर उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात