Menu Close

कर्नाटकमध्ये समाजात धर्मजागृती करून जिज्ञासूंना कृतीप्रवण करणारे विविध उपक्रम !

घरगुती कार्यक्रमात व्याख्यान देतांना (१.) सौ. पवित्रा कुड्व

बेंगळुरू : हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत कर्नाटकात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तेथे व्याख्यानांना समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंदिरे, तसेच काही ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांच्या विवाहाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने व्याख्याने आयोजित केली जात आहेत. या व्याख्यानांनुसार केवळ ‘साधना’, ‘राष्ट्र आणि धर्म’ यांविषयी माहिती प्रसारित केली जात आहे, असे नव्हे, तर जिज्ञासू साधनेकडे कसे वळतील, त्यांच्यात साधनेची गोडी कशी निर्माण होईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. चैतन्याच्या स्तरावर होणार्‍या या व्याख्यानांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

चैतन्याचे स्रोत असणार्‍या मंदिरांमध्ये व्याख्याने !

१. बेळ्तंगडी येथील पडीलमधील अय्यप्पा भजन मंदिरात हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक श्री. चंद्र मोगेर यांनी व्याख्यान घेतले. या कार्यक्रमाला ३३ जिज्ञासू उपस्थित होते.

२. लक्ष्मेश्‍वरच्या बस्तीबण येथे असलेल्या श्री पर्वत मल्लय्य देवस्थानात श्रीमती जयश्री हेबसूर यांचे धर्मजागरण प्रवचन झाले. या प्रसंगी २० जिज्ञासू उपस्थित होते.

३. सुरत्कल येथील इड्य श्री महालिंगेश्‍वर देवस्थानात सनातन संस्थेचे श्री. विवेक पै यांनी व्याख्यान घेतले. १४ धर्माभिमान्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

४. अजेकारु येथील श्री विष्णुमूर्ती देवस्थानात मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यानंतर डॉ. (सौ.) श्रीकला जोशी यांनी गुरुकृपायोगानुसार साधना, सनातनच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये या विषयावर प्रवचन घेतले.

५. बेळ्तंगडी तालुक्यातील नेरिय गावातील काटाजे श्री दुर्गा परमेश्‍वरी देवस्थानात सनातन संस्थेचे श्री. आनंद गौड यांनी ‘साधना आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयी प्रवचन घेतले.

श्री अय्यप्पा भजन मंदिरात व्याख्यान देतांना श्री. चंद्र मोगेर

घरगुती कार्यक्रमांमध्ये व्याख्याने घेऊन अध्यात्मप्रसार

१. विवाहाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात व्याख्यान

धर्माभिमानी श्री. शेखर जोगी यांच्या विवाहाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने सौ. पवित्रा कुड्व यांचे विवाहाचे महत्त्व या विषयावर प्रवचन झाले. यावेळी ७० जण उपस्थित होते. उपस्थितांपैकी तिघांनी धर्मशिक्षण वर्ग आयोजित करण्याची मागणी केली. उपस्थितांपैकी अनेकांनी मंदिर स्वच्छतेत सहभागी होणार असल्याचे सांगितले. काहींनी सूड, कार्कळ येथेही प्रवचनाची मागणी केली.

२. गृहप्रवेशाच्या वेळी अध्यात्मप्रसार !

सनातन संस्थेचे साधक श्री. बी. रामभट पटवर्धन यांनी कक्केबेट्टू येथील सनातनचे हितचिंतक श्री. चंद्रशेखर कक्केबेट्टू यांच्या नूतन गृहप्रवेशाच्या वेळी आयोजित कार्यक्रमात गुरुकृपायोगानुसार साधनेविषयी माहिती सांगितली. या समारंभाला १५० पेक्षा अधिक आप्तेष्ट जमले होते.

स्त्रियांसाठी विशेष व्याख्याने !

१. बोळ्ळेरिमोग्रु शाळेत ‘साधना आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. सनातन संस्थेच्या श्री. जनार्दन गौड यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचा १५ महिलांनी लाभ घेतला.

२. बेळ्तंगडी तालुक्यातील कराय येथे ग्रामपंचायत समुदाय भवनात सनातन संस्थेचे श्री. रमेश यांनी प्रवचन घेतले. या संदर्भात श्री क्षेत्र ग्रामाभिवृद्धीचे वलय सेवा प्रतिनिधी आणि धर्माभिमानी श्री. सीतराम अळ्व कोरींजा यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करून सहकार्य केले. १५ महिलांनी प्रवचनाचा लाभ घेतला.

३. बंट्वाळ तालुक्यातील आम्टुरू येथे स्त्रीशक्ती संघटनेच्या सदस्यांसाठी शौर्य जागरण प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनाचा ४० महिलांनी लाभ घेतला.

शिवमोग्गा जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून राष्ट्र आणि धर्म जागृती !

राष्ट्रजागृती सभेत धर्माभिमान्याने सांगितले प.पू. डॉक्टरांविषयी अनुभव !

पुट्नळ्ळी : येथे राष्ट्र जागृती सभा घेण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय रेवणकर यांनी ‘प्रत्येकाने धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी व्हावे’, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी धर्माभिमानी श्री. नागराज यांनी प.पू. डॉक्टरांविंषयी आणि साधनेविषयी त्यांचे अनुभव मांडले. सभा संपल्यावर उपस्थित धर्माभिमान्यांनी२ ठिकाणी धर्मशिक्षण वर्ग घेण्याची मागणी केली. हिंदुत्वनिष्ठ आणि शाळेचे प्रमुख यांनी प्रत्येक सणांच्या वेळी प्रवचनाचे आयोजन करण्याविषयी सांगितले. व्हॉट्स अ‍ॅपद्वारे साधना, धर्मशिक्षण यांविषयी माहिती प्रसारित केली जाते. या गटांशी समाजातील २०० हून अधिक जिज्ञासूंना जोडणार’, असे या वेळी काही धर्मनिष्ठांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *