परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने…
धारवाड (कर्नाटक) : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम ठरवण्याविषयी शहरात श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी बैठकीचे आयोजन केले होते. प्रारंभी श्रीराम सेनेचे श्री. गंगाधर कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचा उद्देश, रूपरेषा यांविषयी माहिती सांगितली. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी, तसेच त्यांच्या कार्याविषयी माहिती देऊन श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, ‘‘अमृत महोत्सवाच्या दिवशी कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश हा आहे की, प.पू. गुरुदेवांचे चैतन्य ग्रहण करून ते सहस्रो लोकांपर्यंत पोचवायचे आहे. असे करून त्यांनाही धर्मकार्याला जोडून घ्यायचे आहे. श्रीराम सेना वृद्धींगत होऊ नये, यासाठी अनेक जण आम्हाला तुडवण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र आम्हाला आधार आणि धैर्य देणारी एकमेव संस्था आहे, ती म्हणजे सनातन संस्था अन् परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले ! त्यामुळे या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्याप्रती कृतज्ञता अर्पण करायची आहे. त्यांना सर्वांत अधिक आवडणारा विषय म्हणजे धर्मप्रसार करणे आणि हिंदु राष्ट्र स्थापन करणे; म्हणून त्या दिवशी एका धर्मसभेचेही नियोजन करणार आहोत.’’
अमृत महोत्सवाच्या दिवशी म्हणजे १८ मे या दिवशी शहरातील गांधीचौकात सकाळी ८ वाजता मृत्यूंजय शांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून पुण्याहवाचन, मृत्यूंजय शांती होम, रामतारक होम प्रारंभ आदी विधी होणार आहेत. या बैठकीला हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विदुला हळदीपूर याही उपस्थित होत्या.
बैठकीच्या वेळी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी प्राप्त झालेले अभिप्राय
श्री. मुतालिक यांनी ‘कार्यक्रम कसा असावा’ याविषयी उपस्थित ३५ कार्यकर्त्यांचा अभिप्राय घेतला. त्या वेळी खालील प्रमाणे अभिप्राय प्राप्त झाले.
१. धारवाड येथील श्री दत्तात्रेय देवस्थानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्य वृद्धीसाठी मृत्यूंजय होम करणे
२. अमृत महोत्सवाच्या दिवशी दिवशी धर्मसभा घेणे
३. गुरुदेवांच्या नावाने धर्मरथ (जागृती रथ) बनवून खेड्यांमध्ये प्रचार करणे
४. सार्वजनिक ठिकाणी होम करणे
५. धर्मजागृतीसाठी शाळा-महाविद्यालयांतून पुस्तक वितरण करणे
६. शोभायात्रा काढणे
७. भित्तीपत्रके लावणे
८. प्रत्येक चौकात थांबणार्या युवकांना कार्यक्रमाचे महत्त्व सांगून सहभागी करून घेणे
९. पत्रकार परिषद घेणे
१०. महिला मंडळांना भेटणे
११. धारवाड जिल्ह्यातील सर्व हिंदू संघटना तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना भेटणे
१२. देवस्थान समितींना (मंडळांना) भेटणे
कार्यक्रमाचे दायित्व उत्स्फूर्तपणे स्वीकारणारे धर्माभिमानी !
धर्माभिमानी श्री. प्रवीण लांडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे दायित्व स्वीकारले. अनुमाने ३०० लोकांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले.
मृत्यूंजय शांती यज्ञाचे दायित्व धर्माभिमानी स्वीकारणारे पं. नागेश शास्त्री जोशी !
धारवाड येथील श्री जगद्गुरु शंकराचार्य पाठशाळेचे पं. नागेश शास्त्री जोशी यांनी प.पू. डॉक्टरांसाठी मृत्यूंजय शांती यज्ञाचे संपूर्ण दायित्व घेऊन त्याचा व्यय स्वतः करणार असल्याचे सांगितले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री. प्रमोद मुतालिक मुख्य वक्ते असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध वैद्य डॉ. एस्.आर्. रामनगौडर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सहकारी धुरीण संघटनेचे श्री. रवी एलिगार हे उपस्थित असणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात