पेट्रोल पंप चालकांनी ग्राहकांचे हितरक्षण करणाऱ्यां सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
पणजी : पेट्रोलपंप चालकांनी ग्राहकांचे हितरक्षण करणा हिंदु जनजागृती समितीची समाजसाहाय्यपर उपक्रमांतर्गत उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच त्यासंबंधीचा फलक लावावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १० मे या दिवशी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन् यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे माजी गोवाप्रमुख श्री. रमेश नाईक, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, हिंदु धर्माभिमानी श्री. त्रिवेंद्र नाईक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुशांत दळवी आणि श्री. जयेश थळी आणि सनातन संस्थेचे श्री. राज बोरकर यांचा समावेश होता.
या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांना सतत निरनिराळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी या अन्यायाच्या विरोधात नागरिकांना कृतीप्रवण करून दिशा देण्यासाठी हिंदु जनजागृती समिती कटीबद्ध आहे. आजपर्यंत हिंदु जनजागृती समितीने समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील समस्यांच्या निवारणासाठी अनेक यशस्वी चळवळी राबवल्या आहेत. याच समाजसाहाय्यपर उपक्रमाचा एक भाग म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालय आणि पेट्रोलियम कंपन्या यांनी ग्राहक संरक्षण कायदामध्ये दिलेल्या निर्देशानुसारच्या सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी विनामूल्य आणि मूलभूत सेवा म्हणून उपलब्ध कराव्यात. स्थानिक पेट्रोलपंप चालकांनी ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार पेट्रोल आणि डिझेेल यांच्या शुद्धतेची निश्चिती करण्याकरता फिल्टर पेपर उपलब्ध करून द्यावा. प्रतीदिन नोंदवलेले डेन्सिटी रजिस्टर (घनता मापनाची नोंदवही) ग्राहकांना पहाण्यास उपलब्ध करावी. ग्राहकांनी घेतलेल्या इंधनाच्या मापनामध्ये तफावत असल्याची ग्राहकाला शंका असल्यास इंधन तपासून घेण्याकरता नियमांना अधीन असलेले मोजमाप पात्र उपलब्ध करून द्यावे. ग्राहकांना तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार पुस्तिका अथवा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून द्यावा. जागो ग्राहक जागो या मथळ्याखाली इंधन शुद्धता तपासण्यासाठी फिल्टर पेपर, इंधन मोजण्यासाठीचे मोजमापपात्र आणि तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार पुस्तिका या ठिकाणी उपलब्ध आहेत, अशा आशयाचा फलक पेट्रोलपंपाच्या ठिकाणी दर्शनी भागात लावावा. काही पेट्रोलपंपाना भेट दिल्यानंतर वरील सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळून आले. या निवेदनाची प्रत भारत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालय, भारत सरकार आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक मंत्रालय, भारत सरकार यांनाही देण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात