Menu Close

पुणे येथे आज होणाऱ्यां भव्य हिंदु ऐक्य दिंडीला उपस्थित रहाण्याविषयी महापौरांचे आश्वासन

पुणे : सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येथे १४ मे या दिवशी भव्य ‘हिंदु ऐक्य दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीमध्ये पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता टिळक यांनी उपस्थित रहावे, याविषयीचे निमंत्रण प.पू. संतश्री आसारामजी बापू संप्रदायाचे श्री. विजय दीक्षित, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रवीण नाईक, सनातन संस्थेचे ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेले श्री. प्रवीण कर्वे आणि ६२ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. विजया भिडे, तसेच अन्य धर्माभिमानी महिला यांनी त्यांना दिले. या वेळी सौ. टिळक यांनी दिंडीचे निमंत्रण स्वीकारत आश्वस्त केले की, ‘मी वेळात वेळ काढून दिंडीच्या प्रारंभी उपस्थित राहीन.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *