Menu Close

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंदिर स्वच्छता

कसाल पावणाई रवळनाथ मंदिर आणि परिसराची स्वच्छता करतांना ग्रामस्थ आणि सनातनचे साधक

कुडाळ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. कुडाळ तालुक्यातील कसाल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिरात ९ मे या दिवशी सामूहिक मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. प्रारंभी श्री देवी पावणाई आणि श्री देव रवळनाथ यांच्या चरणी प्रार्थना आणि वंदन करण्यात आले. त्यानंतर मंदिर आणि मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली. साफसफाई पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने श्री देवी पावणाईच्या चरणी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी साकडे घालण्यात आले.

मंदिर स्वच्छतेचे महत्त्व विषद करतांना १. डॉ. संजय सामंत

या वेळी सनातनचे साधक डॉ. संजय सामंत यांनी साकडे घालण्यामागील कारण उपस्थितांना स्पष्ट केले. त्यानंतर मंदिराची सफाई पूर्ण झाल्यावर ‘मंदिर सफाईचे महत्त्व’, विषद करून सफाईची सेवा पूर्ण झाल्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी १५ ग्रामस्थ उपस्थित होते.
सफाईच्या सेवेसाठी अनुमाने ७० वर्षांच्या श्रीमती परब आजी उपस्थित होत्या, तसेच अलिकडेच नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या एक महिला सहभागी झाल्या होत्या. मंदिर स्वच्छतेच्या सेवेत सहभागी झाल्यानंतर त्या म्हणाल्या, ‘‘घरी एवढे काम केल्यावर थकवा जाणवतो; परंतु इकडे तसे काहीच जाणवले नाही.’’

मंदिर स्वच्छतेच्या सेवेत श्री. एकनाथ आणि श्री. अंकुश भिवा पारकर, श्री. बबन पारकर, सिद्धी परब, गौरी राणे, श्‍वेता राणे, शितल परब, श्रीमती सत्यवती परब (आजी), श्री. चंद्रकांत परब, श्री. राजेंद्र जेठे, सौ. महानंदा जेठे, श्री. तेजस रावले, श्री. बाळकृष्ण परब, श्री. सुभाष कसालकर आणि श्री. प्रथम शर्मा सहभागी झाले होते.

कणकवली

तालुक्यातील आशिये (खालची गुरववाडी) येथे ११ मे या दिवशी श्री. श्रीधर गुरव यांचे घरी, युवा शौर्य जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ८० ग्रामस्थांसह १२ लहान मुलेही सहभागी झाली होती. हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी ‘शौर्य जागरण’, तर सिंधुदुर्ग जिल्हा रणरागिणी शाखा समन्वयक सौ. अंजली मणेरीकर यांनी, ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’, विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश सावंत यांनी केले. या वेळी श्री. शंकर गुरव, सरपंच-आशिये; श्री. मधुकर गुरव, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

क्षणचित्रे

उपस्थितांमध्ये युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम संपल्यावर काही युवकांनी चर्चेसाठी थांबून अधिक माहिती घेतली, तसेच स्वसंरक्षण वर्ग चालू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कार्यक्रम स्थळी सनातनचे ग्रंथ प्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचा कक्ष लावण्यात आला होता.
शिबिरासाठी श्री. श्रीधर गुरव, आशिये यांनी जागा उपलब्ध करून दिली.
श्री. शशिकांत पुजारे, आशिये यांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिली.
श्री. निखिल गुरव आणि श्री. प्रकाश गुरव आणि त्यांचे मित्रमंडळ यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साहाय्य केले.
रामेश्‍वर बॅटरी, कणकवली यांनी कार्यक्रमासाठी बॅटरी उपलब्ध करून दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *