सिंधुदुर्ग
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सिंधुदुर्गवासियांचा या उपक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. अंजली मणेरीकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
वैभववाडी
येथील सुवर्णामंगल कार्यालयात ७ मे या दिवशी हिंदू शौर्य जागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला वैभववाडी पंचायत समितीचे सभापती श्री. लक्ष्मण उपाख्य राजू रावराणे यांच्यासह एकूण ३५ जण उपस्थित होते. विविध शंका विचारून उपस्थित महिलांनी शंकानिरसन करून घेतले. मेळाव्यातील मार्गदर्शन ऐकल्यानंतर कोकिसरे येथे प्रशिक्षण वर्ग चालू करावा, अशी उपस्थितांनी इच्छा व्यक्त केली.
वेतोरे
येथील श्री देव रवळनाथ मंदिरात ८ मे या दिवशी, ‘युवा शौर्य जागरण’, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला ३० जणांची उपस्थिती होती.
रानबांबुळी
मंदिर स्वच्छता कार्यक्रमाच्या अंतर्गत ९ मे या दिवशी कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील श्री देव रवळनाथ गिरोबा मंदिराची स्वच्छता करण्यात आली. सनातनचे श्री. सुनिल भोवर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची ओळख श्री. पुंडलिक गवस यांनी करून दिली. देवस्थानचे मानकरी श्री. बाबुराव परब यांनी, ‘हिंदु राष्ट्र निर्मिती व्हावी’, यासाठी देवाकडे गार्हाणे (साकडे) घातले. येथील ग्रामस्थ श्री. एकनाथ मळवे यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना थंड पेय दिले.
तेर्सेबांबर्डे
येथील श्री विठ्ठल मंदिरात ८ मे या दिवशी हिंदू शौर्य जागरण मेळावा झाला. तेर्सेबांबर्डे येथील प्रशिक्षण वर्गातील युवकांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश धुरी यांनी केले, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचा परिचय सौ. नीलिमा सामंत यांनी करून दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात