सनातन संस्थेकडून राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी मार्गदर्शन
पेण : येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यामंदिर शिर्की या शाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या सचित्र माहिती देणार्या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेचे श्री. जांभळेगुरुजी यांनी राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाचा लाभ आजूबाजूच्या गावातील २१३ विद्यार्थी आणि १३ शिक्षक यांनी घेतला.
प्रदर्शनाचे उद्घघाटन दीपप्रज्वलनाने आणि सरस्वतीदेवीच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. मनोहर वर्तक आणि शाळा समितीचे अध्यक्ष श्री. जोमा पाटील अन् प्रभारी अध्यक्ष श्री. तुळशीदास गावंड यांनी दीपप्रज्वलन आणि सरस्वतीदेवीचे पूजन केले. शिर्की प्राथमिक शाळेचे अध्यक्ष श्री. रमाकांत पाटील यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन केले.
क्षणचित्रे
१. प्रदर्शनाच्या सिद्धतेसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन साहाय्य केले.
२. प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी विद्यार्थ्यांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत म्हणून मान्यवरांचे स्वागत केले.
३. शाळेतील विद्यार्थ्यांनी फ्लेक्स फलकांवरील माहिती लिहून घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात