अन्य धर्मियांच्या देवतांचा अशा प्रकारे वापर होत नाही, हे लक्षात घ्या !
पुणे : वाहन चालवतांना भ्रमणभाषचा वापर टाळण्यासाठी वाहतूक पोलीस यमराजाची वेशभूषा केलेल्या स्वयंसेवकांचे साहाय्य घेणार आहेत. (वाहतुकीचे नियम पाळणे महत्त्वाचे असले तरी त्यासाठी देवतांचे मानवीकरण करणे अयोग्य आहे. समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचाच हा परिणाम आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलणे प्राणावर बेतू शकते, असे हा यमराजाची वेशभूषा केलेला स्वयंसेवक वाहन चालकांना सांगणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एम्.पी. सरतापे यांनी सांगितले की, यमराजाला प्रत्यक्ष पाहिल्यामुळे वाहनचालकांमध्ये नियम पाळण्याचे गांभीर्य वाढेल. (अशा हास्यास्पद उपाययोजना करण्याऐवजी नियम तोडणार्यांगना कठोर शासन करणे, ही योग्य उपाययोजना करायला हवी. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात