विश्व हिंदु परिषदेच्या अभियानाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे समर्थन
योगी आदित्यनाथ असे समर्थन देऊ शकतात, तर भाजपचे अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का देऊ शकत नाहीत, असा प्रश्न हिंदूंच्या मनात येतो !
११ व्या शतकात राजा सुहेलदेव आणि गाजी सय्यद सालार मसूद यांच्यात युद्ध झाले होते. तेव्हा सूर्यमंदिर तोडून दर्गा बांधण्यात आला होता.
लक्ष्मणपुरी : उत्तरप्रदेशातील बहराईच येथे १ सहस्र वर्षे जुन्या गाजीबाबा दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी सूर्यमंदिर होते. ते तोडून आक्रमकांनी दर्गा बांधला. त्यामुळे येथे पुन्हा सूर्यमंदिराची उभारणी करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेने मागणी केली आहे. या मागणीला राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समर्थन दिले आहे. विहिंपने राजा सुहेलदेव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सूर्यमंदिर उभारण्याची मागणी केलेली आहे. ११ व्या शतकात राजा सुहेलदेव आणि गाजी सय्यद सालार मसूद यांच्यात युद्ध झाले होते. तेव्हा सूर्यमंदिर तोडून दर्गा बांधण्यात आला होता. वर्ष २०१४ च्या लोकसभेतील विजयानंतर भाजपने या मंदिराचे सूत्र उपस्थित केले होते. सरकार स्थापन झाल्यावर येथे गाजीपूर ते देहली अशी सुहेलदेव एक्स्प्रेस चालू करण्यात आली आहे.
लक्ष्मणपुरी येथील कार्यक्रमात योगी आदित्यनाथ म्हणाले की, गजनी आणि त्याचा पुतण्या गाजी मसूद यांनी भारतातील हिंदूंची अनेक धार्मिक स्थाने तोडली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात