पाश्चात्त्य देशांना भारतीय धर्मग्रंथांचे महत्त्व समजू लागलेले आहे; मात्र भारतियांना अद्याप ते उमजलेले नाही !
बुखारेस्ट : भारत आणि रोमानिया यांच्यात सांस्कृतिक संबंध आहेत. रोमानियातील ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो, यातून हे लक्षात येते, असे प्रतिपादन रोमानियाचे भारतातील राजदूत राडू ओक्टावियन डोबरे यांनी केले. रोमानियामध्ये बॉलिवूड संदर्भात २ वाहिन्या कार्यक्रम दाखवतात, असेही त्यांनी सांगितले.
डोबरे पुढे म्हणाले की, दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ झाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी रोमानियाचे समर्थन आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात