हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
नवी देहली : बुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी आदि शंकराचार्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय तत्त्वज्ञ दिन साजरा करण्यात आला. नवोदयम् आणि फेथ फाऊंडेशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी खासदार श्री. अश्विनी चौबे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह श्री. अलोक कुमार, गार्गी महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या प्रमुख प्रा. अनामिका आणि दिव्य ज्योती जागृती संस्थेच्या साध्वी तपेश्वरी भारतीजी उपस्थित होत्या. २०० पेक्षा अधिक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समिती सहभागी झाली होती. केंद्रीय संस्कृती मंत्री श्री. महेश शर्मा यांनी पाठवलेला संदेश या वेळी वाचून दाखवण्यात आला. आदि शंकराचार्यांनी अखेरचे दर्शन दिलेल्या केदारनाथ येथे भक्तांना प्रार्थना करण्यासाठी आदि शंकराचार्य स्मृतीभवन उभारण्यात यावे, अशी मागणी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. या कार्यक्रमात ग्लोबल सोसायटी, युवा फाऊंडेशन आणि रमण केंद्र यांनीही सहभाग घेतला होता. ग्लोबल सोसायटीचे श्री. पंकज चतुर्वेदी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला देहली आणि बेंगळुरू येथील हिंदु हेरिटेज फाऊंडेशनचे सदस्यही उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात