बिहारमधील हरिपूर (हाजीपूर) येथे शासनाला निवेदन सादर
हरिपूर (हाजीपूर), वैशाली (बिहार) – प्रत्येक पेट्रोलपंपांवर ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार पेट्रोलची शुद्धता मोजण्यासाठी ‘फिल्टर पेपर’ उपलब्ध करणे, प्रतिदिन जमा केलेले ‘डेन्सिटी रजिस्टर’ पहाण्यासाठी ठेवणे, इंधन तपासण्यासाठी सरकारी माप उपलब्ध करणे, तक्रार पुस्तक ठेवाणे आणि हे सर्व सूत्रे ‘जागो ग्राहक जागो’ या शीर्षकाखाली एका फलकावर लिहून तो फलक पेट्रोलपंपांच्या दर्शनी भागावर ठेवणे या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ६ मे या दिवशी हरिपूर येथे जिल्हाधिकार्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राकेश श्रीवास्तव, सौ. सीमा श्रीवास्तव आणि अधिवक्ता श्री. वेद प्रकाश उपस्थित होते.