२.५.२०१७ या दिवशी डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून भृगु महर्षींचा आशीर्वादाचा फलादेश झाला. या फलादेशात भृगु महर्षींनी सनातनच्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिले. पहिल्यांदाच एवढा मोठा फलादेश झाला. यात भृगु महर्षि म्हणाले, परात्पर गुरु डॉक्टरांचा अमृत महोत्सव हा प्रकाशोत्सवच आहे. या दिवसाला तुम्ही विष्णु प्रतिरूप तपोनिष्ठ तपोमूर्ती डॉ. जयंत-अवतार दिवस असे म्हणा. परात्पर गुरु डॉक्टरांचा अवतार पुढे चिरंजीवी अवतार म्हणून नावाजला जाईल. म्हणजेच त्यांचे कार्य शाश्वत कार्याचेच एक प्रतीक म्हणून गणले जाईल. या दिवशी आम्ही तेथे प्रत्यक्ष येऊन सुदर्शन यज्ञ आणि शांती यज्ञ करू.
या फलादेशाचे महत्त्व म्हणजे भृगु महर्षींनी प्रथमच फलादेशातून हिंदु राष्ट्र येईल आणि धर्माची स्थापना होईल, असा महाआशीर्वाद देऊन हिंदु राष्ट्र येण्याविषयीच्या विचारावर ईश्वराचा ठसा उमटवला.
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात