Menu Close

अमृत महोत्सवानिमित्त तेलंगण राज्यातील गोशामहल मतदारसंघातील आमदार श्री. राजासिंह यांनी व्यक्त केलेला अभिप्राय

श्री. राजासिंह

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले या वयातही करत असलेले राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य हे दैवी आशीर्वादाविना अशक्य !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे इतके वय असूनही धर्म आणि राष्ट्र यांसाठी कार्य करत आहेत. हे कार्य दैवी आशीर्वाद असल्याविना करणे अशक्य आहे. जो कोणी धर्म आणि राष्ट्र यांसाठी अशा प्रकारे कार्य करतो, त्याच्यावर ईश्‍वराची कृपा असतेच. धर्मो रक्षति रक्षित: या भगवान श्रीकृष्णाच्या वचनाप्रमाणेच हे कार्य आहे. दैनिक सनातन प्रभात हे एकमेव दैनिक आहे की, जे हिंदूंविषयी सत्य आणि निर्भीडपणे लिहीत आहे. अन्य वृत्तपत्रे हिंदूंसंबंधी लिहायला घाबरतात, असे उद्गार भाग्यनगरचे आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांनी काढले.

खंडाळा (जिल्हा पुणे) येथील हिंदु धर्मजागृती धर्मसभा चालू होण्यापूर्वी आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत बोराटे, सौ. राजश्री तिवारी आणि सनातन संस्थेचे श्री. विठ्ठल जाधव यांनी भेट घेतली. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांना दिल्यावर त्यांनी वरील उद्गार काढले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *