तीव्र आंदोलनानंतर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींनी प्लास्टिक खाल्ल्याने त्यांचा मृत्यू ओढावला या मृत्यूस उत्तरदायी असणार्या सर्वांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी १३ मे या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वारकर्यांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर १५ मे या दिवशी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. कार्यालयाच्या वतीने निवासी उपविभागीरी श्री. शेंडगे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी श्री. शेंडगे यांनी आम्ही यावर निश्चित कृती करू, असे आश्वासन दिले. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गोशाळेचा कारभार पारदर्शक व्हावा तसेच चारा आणि संगोपन योग्य व्हावे यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. या वेळी हिंदू महासभेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब डिंगरे, समाजसेवक सुनील सतपाल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रतापसिंह साळुंखे, पेशवा युवा मंचचे श्री. गणेश लंके, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजन बुणगे, शशीशेखर पाटील, मोहन लोखंडे, राजेंद्र माळी आदी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात