Menu Close

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या कार्यवाहीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती

पाक या निर्णयाची कार्यवाही करील, अशी अपेक्षा करण्यापलीकडे भारत काही करील,अशी शक्यता नाही ! –  संपादक, दैनिक सनातन प्रभात

कुलभूषण जाधव

हेग (नेदरलॅण्ड) : येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे या दिवशी कुलभूषण जाधव हे हेर आहेत कि नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगत जाधव हे भारतीय गुप्तचर संस्था रॉचे हस्तक असल्याचा पाकचा दावा फेटाळून लावला आहे. अंतिम निकाल येईपर्यंत पाकने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेची कार्यवाही करू नये, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास पाकवर कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. जाधव यांना दया याचिका प्रविष्ट करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक देशाला आधीच निकाल घोषित करून शिक्षा देण्याचा अधिकार नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पाकने कोणती पावले उचलली, याचे स्पष्टीकरण त्यास द्यावे लागणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *