Menu Close

हिंदु राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी कान्हादेशातील हिंदूंही सरसावले !

धुळे येथील आेंकारेश्‍वर महादेव मंदिरात स्वच्छता करतांना धर्माभिमानी

१. धुळे शिवशक्तीनगरातील श्री हनुमान मंदिरात साधना आणि हिंदु राष्ट्र या विषयावर श्री. उदय बडगुजर यांनी प्रवचन घेतले.

२. चोपड्यातील साने गुरुजी वसाहतीत साधना आणि हिंदु राष्ट्र या विषयावर कु. जयश्री पाटील यांनी प्रवचन घेतले. उपस्थित महिलांनी धर्मशास्त्र जाणून घेण्याची सिद्धता दर्शवत प्रत्येक सप्ताहात नियमित सत्संग चालू करण्याची मागणी केली. प्रवचनासाठी सौ. सपना भोई यांनी दायित्व घेऊन सेवा केली. ३० हून अधिक महिला या वेळी उपस्थित होत्या.

३. धुळे येथे सामूहिक मंदिर स्वच्छता अभियानांतर्गत श्री संकटमोचन हनुमान मंदिर, श्री आेंकारेश्‍वर महादेव मंदिर आणि हमाल मापाडी भागातील श्री हनुमान मंदिर येथे स्वच्छता करण्यात आली. या वेळी हिंदु एकता आंदोलन पक्षाचे श्री. मनोज घोडके, श्री. शेखर भडांगे, श्री. पंकज धात्रक यांच्यासह स्थानिक धर्माभिमान्यांंनी सहकार्य केले.

४. हमाल मापाडी भागातील श्री हनुमान मंदिरात साधना आणि हिंदुु राष्ट्र या विषयावर श्री. पंकज बागुल यांनी प्रवचन घेतले या वेळी ४० धर्माभिमानी उपस्थित होते.

बुर्‍हानपूर (मध्यप्रदेश) : येथील महालक्ष्मी मंदिरात १४ आणि १५ मे या दिवशी गोपाळ नगर येथील साई मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या वेळी रंजना दाणेज, सौ. पिंकी माहेश्‍वरी, सौ. कुसुम माहेश्‍वरी, कु. दिप्ती माहेश्‍वरी आणि हिंदु धर्माभिमानी श्री. संदीप आणि अन्य २ धर्माभिमानी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *