दलोरी : ईशान्य नायजेरियातील दलोरी गावात आणि परिसरात रविवारी रात्री बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ८६ जणांचा मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यादरम्यान आपला जीव वाचविण्यात यशस्वी ठरलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की दहशतवाद्यांनी अनेक घरांना आग लावली. तर, काही गावकऱ्यांवर गोळ्याही झाडल्या. तसेच या गावात दोन ठिकाणी आत्मघाती हल्लेही करण्यात आले. सगळीकडे मृतदेह पडले होते. दहशतवाद्यांकडे प्रचंड शस्त्रसाठा असल्याने सुरक्षा रक्षकही त्यांच्याशी लढण्यात असमर्थ ठरले.
नायजेरियामध्ये जहालमतवादी संघटना असलेल्या बोको हरामचा पाश्चिमात्य सभ्यतेला विरोध असून, ते मागीलवर्षापासून नायजेरियामध्ये असे हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
संदर्भ : सकाळ