शहरात स्वच्छता अभियान आणि प्रवचने यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंदूसंघटनाचा दिसे आविष्कार निमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियानाचे ।
राष्ट्र-धर्म रक्षणार्थ एकवटले धर्माभिमानी जळगाव आणि नंदुरबारचे ॥
नंदुरबार : येथे सनातन संस्थेच्या साधकांनी आणि हिंदु जनजागृती समितीच्या साधकांनी शहरातील पुतळे, मंदिरे यांची स्वच्छता करून, तसेच प्रवचने घेऊन हिंदु राष्ट्र जागृती अभियान राबवले. शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अर्धाकृती आणि वीर योद्धा महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. नगरपालिकेने यासाठी बंब पाठवून सहकार्य केले. पुतळ्याजवळ फळे-भाज्या विकणारे मनोहर चौधरी, किशोर भोई, सदाशिव भोई, प्रशांत नुक्ते, श्रीमती कमला भोई, युवराज भोई यांनीही स्वच्छतेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, भावना कदम, प्रा. डॉ. सतिश बागुल यांनीही यात सहभाग घेतला.
अन्य ठिकाणी घेतलेले उपक्रम
१. बालशहिदांच्या स्मारकाचीही स्वच्छता करण्यात आली. या वेळी पवन चव्हाण, प्रेम पेंढारकर, रोहित भावसार, ऋषिकेष सोनार आदींसह कापड दुकानात काम करणार्या मुलांनी उत्स्फूर्तपणे उपक्रमात सहभाग घेतला.
२. पखाली कुवा परिसरातील श्री सप्तश्रृंगी माता मंदिर येथे साधना आणि हिंदु राष्ट्र या विषयावर सौ. निवेदिता जोशी यांनी मार्गदर्शन केले. परिसरातील महिला आणि युवती प्रवचनाला उपस्थित होत्या. समितीचे प्रा. डॉ. सतिश बागुल यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.
३. मंदिर स्वच्छतेसाठी स्थानिकांकडून साहित्य उपलब्ध
भोणे येथे श्री मारुति मंदिरात स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. स्थानिकांनी स्वच्छतेचे साहित्य उपलब्ध करून दिले. नंतर महाआरती करण्यात आली. समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी मंदिरांचे महत्त्व या विषयावर प्रवचन घेतले. स्थानिक रहिवासी मनोज माळी, राकेश माळी, राहुल निळे, दर्शना माळी, कल्पेश चौधरी, सुरेश जैन यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
४. प्रतिदिन सायंकाळी मंदिर स्वच्छता करण्याचा युवकांचा निर्धार
मरिमाता मंदिरातही स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. महादेव ग्रुप नामक युवकांच्या चमूने यात उत्स्फूर्त सहभाग घेत प्रतिदिन सायंकाळी मंदिर स्वच्छता करण्याचा निर्धार व्यक्त केला. सौ. उषा मराठे, तेजश्री धात्रक, सौ. कुसुम हराळे, भूषण पाटील, गौरव मराठे, वैभव मराठे, हर्षल परदेशी, चेतन चौधरी, हितेश परदेशी, ऋषिकेष चौधरी, धीरज मराठे यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
५. वीर योद्धा महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेत शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र राजपूत, भावना कदम, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, मयूर चौधरी आदींनी यात सहभाग घेतला.
६. शेतकरी सेवा संघाच्या संकुलातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. यात नामदेव बालाणी, महेश बालाणी, संजय साळवे, दशरथ माळी, रमेश भोयी सहभागी झाले.
७. चौपाळे येथील श्री दुर्गादेवी मंदिरात राबवलेल्या स्वच्छता अभियानात ज्ञानेश्वर राठोड, लालचंद राठोड, पंडित महाजन, शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र राजपूत, भावना कदम, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, मयूर चौधरी आदींसह स्थानिक भक्तांनी सहभाग घेतला.
८. साधना आणि हिंदु राष्ट्र या विषयावरील प्रवचनही २ ठिकाणी घेण्यात आले. प्रवचनाच्या वेळी कधीही शांत न बसणार्याा आणि ऐकण्याच्या मनःस्थितीत नसणारा यश उपासनी (वय ९ वर्षे) हा एकाग्रतेने विषय ऐकत होता.
९. कपिल भंडारी या युवकाने अध्यात्मप्रसारात किंवा धार्मिक कार्यात शरिराने सहभागी होणे म्हणजे नेमके काय, हे समजून घेत अध्यात्मप्रसाराच्या शंकाही जिज्ञासूपणे विचारून घेतल्या.
वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी
१. सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ विक्रीला बसणार्या फेरीवाल्यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून येथे विक्रीला बसत आहोत; परंतु या पुतळ्याच्या स्वच्छतेत प्रथमच सहभागी व्हायला मिळाले. यापुढे १५ दिवसांनी हा उपक्रम आम्ही स्वतः राबवू, असेही ते म्हणाले.
२. सप्तश्रृंगी माता मंदिरातील प्रवचनानंतर उपस्थित महिलांनी साधनेविषयी जिज्ञासेने प्रश्न विचारून गुरुवारी धर्मशिक्षण घेण्याची मागणी केली.
३. भोणे येथील मंदिरासमोरच्या घरातील महिलेने मी नियमित मंदिर स्वच्छता करीन, असे सांगितले.
४. मरिमाता मंदिर स्वच्छतेत सहभागी झालेले युवक क्रिकेट सामना आटोपून आल्याने दमलेले होते; मात्र त्यांनी उत्साहाने स्वच्छता केली आणि आनंद जाणवल्याचे सांगितले. मंदिरासमोरील दांपत्याने महाआरतीचे ताट स्वतः तयार करून आणले. तेथील दुकानातून प्रसादाचे साहित्य विकत घेत असतांना दुकानदार हराळे यांनी पैसे घेण्यास नकार दिला.
गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीसाठी गावकर्यांनी कसायांना गावबंदी करावी ! – डॉ. नरेंद्र पाटील
चौपाळे (जिल्हा नंदुरबार) येथील हिंदु राष्ट्र जागृती सभा
नंदुरबार : महाराष्ट्र्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात गोवंशाची आणि गोधनाची कत्तल केली जात आहे. हे थांबवण्यासाठी आणि कायद्याची प्रभावी कार्यवाही होण्यासाठी आता गावकर्यांनीच कसायांना गावबंदी करायला हवी, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी चौपाळे ता. नंदुरबार येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेत बोलतांना केले.
१. सभेच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून डॉ. नरेंद्र पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
२. सौ. स्वाती घोलप यांनी साधनेचे महत्त्व आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते डॉ. नरेंद्र पाटील यांनी गोवंशियांच्या होणार्या हत्या, तसेच हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच समितीने चालवलेल्या सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन अभियानाची माहिती दिली आणि माहितीच्या अधिकारात माहिती मागवणे, आंदोलन करणे, हिंदु जनजागृती समितीला याची माहिती देणे याविषयीचे आवाहन केले.
या प्रसंगी उपस्थितांनी हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीची सामूहिक प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा वाचन श्री. रोहित चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन सौ. कल्याणी बंगाळ यांनी केले. सभेसाठी ज्ञानेश्वर राठोड, लालचंद राठोड, पंडित महाजन, गावातील भजनी मंडळ, क्षितीज मराठे, मयूर चौधरी, ऋषिकेष सोनार, जितू मराठे, जितेंद्र राजपूत, राजू चौधरी, भावना कदम आदींनी परिश्रम घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात